मुंबई : विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि कथित घोडबाजाराचा मुद्दा प

मुंबई : विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि कथित घोडबाजाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खा. सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीच्या आरोपांना उत्तर देताना, “माणसं पैशांपेक्षा प्रेम, विश्वास आणि संवादाच्या बळावर जिंकता येतात,” असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांच्या टीकेला शनिवारी प्रत्युत्तर दिले.
नवी मुंबई येथे माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेत सुधारणा व्हायला हव्यात, याबाबीला आपली कोणतीही हरकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात संसदेत किंवा अन्य स्तरावर कोणतेही विधेयक आणले गेले, तर त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांच्याशी स्नेहपूर्ण संबंध ठेवले तर त्यांना आकर्षित करण्यासाठी आर्थिक प्रलोभनांची गरज भासत नाही. त्यामुळे निवडणुकांमधील कथित गैरप्रकारांविषयी चर्चा करण्यापेक्षा लोकांशी असलेले नाते अधिक महत्त्वाचे आहे.
कोकण विधान परिषद मतदारसंघातील घडामोडींविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांच्या माघारीबाबत प्रतिक्रिया दिली. बाळ माने यांचे पूर्वीपासूनच भाजपशी संबंध असल्याचे सांगत त्यांनी पक्षप्रवेशाबाबतचा अंतिम निर्णय पक्ष संघटनेचा असेल, असे स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल, तो सर्वांना मान्य असेल, असे सांगत फडणवीस यांनी पक्षशिस्तीवर भर दिला. मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनही आपण त्या निर्णयाचा आदर करू, असे त्यांनी नमूद केले. महाविकास आघाडीतील काही उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला होता. विरोधकांना लक्ष्य करणाऱ्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना, भाजपने आपल्याला अधिक बोलण्यास भाग पाडू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
खा. सुप्रिया सुळे यांचा घोडबाजाराचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी विधान परिषद निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोडबाजार झाल्याचा आरोप पुन्हा एकदा केला आहे. अलीकडील निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर दबाव आणण्यासाठी विविध यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा दावा त्यांनी केला.

COMMENTS