‘सोळा हजारात देखणी’… ‘ही’ लावणी सम्राज्ञी करणार राष्ट्रवादीत प्रवेश…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘सोळा हजारात देखणी’… ‘ही’ लावणी सम्राज्ञी करणार राष्ट्रवादीत प्रवेश…

प्रतिनिधी : पुणेआगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षवाढीसाठी तयारी सुरु केली आहे . मागील काही दिवसांपासून राष्ट्रव

सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय थांबवा : अजित पवार l DAINIK LOKMNTHAN
जनतेचे प्राण वाचवण्याला प्राधान्य दिले हा संदेश जगाला देऊया : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सर्वोत्तम महानगर विकसित करताना आराखड्यांमध्ये सूचनांचा अंतर्भाव करावा : अजित पवार

प्रतिनिधी : पुणे
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षवाढीसाठी तयारी सुरु केली आहे . मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचे वारे वाहू लागले आहे .

आता लवकरच लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहे. येत्या 16 सप्टेंबरला मुंबई एनसीपी ऑफिसमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर हाती घड्याळ बांधणार आहे. पुणेकर यांच्यासोबत इतर १६ कलावंतही राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे .

दरम्यान सुरेखा पुणेकर यांनी अनेकदा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. मराठी मातीतील लावणीला परदेशातही मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या सुरेखा ताईंचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील हमालीचे काम करत असत.

वाईट परिस्थीतीवर मात करत आज सुरेखा पुणेकरांनी महाराष्ट्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली.शाळेची पायरीही न चढलेल्या सुरेखाताईंनी वयाच्या आठव्या वर्षी पायात घुंगरू बांधले. बैलागाडीचा तमाशा आणि पारावरच्या तमाशापासून त्यांनी लावणीची सुरुवात केली.

COMMENTS