https://www.youtube.com/watch?v=kO8Zx7qLL0g या सभेस पंचायत समितीच्या समन्वयक शिल्पा मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी गटातील महिलांना बचत गटाचे व
या सभेस पंचायत समितीच्या समन्वयक शिल्पा मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी गटातील महिलांना बचत गटाचे व्यवस्थापन, आर्थिक शिस्त, महिला सक्षमीकरण तसेच विविध शासकीय योजनांबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच कृषी सहाय्यक व्ही. एस. सोनवणे साहेब यांनी शेतकरी महिलांना खत अनुदान योजनांची सविस्तर माहिती दिली. खत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अर्ज कसा भरावा, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत आणि अर्ज प्रक्रियेत कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
पशु व्यवस्थापक आजिनाथ बारगळ यांनी पशुधनाचे आरोग्य, पशुपालनातील योग्य व्यवस्थापन, पशूंना होणारे विविध आजार, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच लसीकरणाचे महत्त्व याबाबत माहिती दिली.
तसेच कृषी व्यवस्थापक जगताप साहेब यांनी सेंद्रिय (ऑरगॅनिक) शेतीचे महत्त्व, सेंद्रिय खतांचा वापर, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्याचे फायदे आणि शाश्वत शेती पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सभेमध्ये उपस्थित महिलांनी विविध विषयांवर चर्चा करून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला व सर्व उपस्थितांनी मार्गदर्शकांचे आभार मानले.

COMMENTS