बीड : मोमीनपुरा बायपास ते देवी मंदिर खासबाग यांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण मार्गावर नदीपात्रामुळे सातत्याने निर्माण होणाऱ्या धोक्यामुळे नागरिकांमध्

बीड : मोमीनपुरा बायपास ते देवी मंदिर खासबाग यांना जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण मार्गावर नदीपात्रामुळे सातत्याने निर्माण होणाऱ्या धोक्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला असून तातडीने पुलाचे बांधकाम सुरू करावे, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शेख फारुख यांनी केली आहे. “नारळ फोडून उद्घाटन झाले, पण कामाचा मागमूस नाही; आता पुलाशिवाय पर्याय नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
या मार्गाचा वापर मोमीनपुरा, खासबाग परिसरातील हजारो नागरिक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक रोज करतात. मात्र नदीपात्रातून जाणारा हा रस्ता पावसाळ्यात पूर्णतः बंद पडतो. पाणी वाढल्यास प्रवास थांबतो आणि नागरिकांना मोठा फेरा मारून प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वेळ आणि आर्थिक नुकसान होत आहे. काही काळापूर्वी या कामाचे उद्घाटनाचे कार्यक्रम झाले, मात्र प्रत्यक्ष कामाच्या दृष्टीने कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही.
सध्या बार्शीनाका चौकातील पुलाचे काम सुरू असल्याने या पर्यायी मार्गावरील वाहतूक कमालीची वाढली आहे. त्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढला असून शालेय विद्यार्थी व दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास मोमीनपुरा व खासबाग परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेख फारुख यांनी दिला आहे.

COMMENTS