Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेन्शनधारकांचे आज उपोषण

श्रीरामपूर : सार्वजनिक, खाजगी, सहकारी क्षेञातील ई.पी.ऐस.-९५ योजनेतील पेन्शनधारकांना वेळोवेळी आश्वासने देवूनही पेन्शान वाढीचा निर्णय होत नाही. त्यामुळे

पंधरा वर्षांपासून पुलाचे काम अपूर्ण  धोकादायक रस्ता व पुलामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात; भोसे ग्रामस्थांचे उपोषण
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथील शेकडो ग्रामस्थ शेतकरी बसले आमरण उपोषणाला
जल जीवन योजने अंतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनेतील दुरुस्तीसाठीजांब गावातील गावकर्‍यांसह सरपंच व सदस्यांचे अमरण उपोषण सुरू

श्रीरामपूर : सार्वजनिक, खाजगी, सहकारी क्षेञातील ई.पी.ऐस.-९५ योजनेतील पेन्शनधारकांना वेळोवेळी आश्वासने देवूनही पेन्शान वाढीचा निर्णय होत नाही. त्यामुळे याप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी आज बुधवार(दि.२१) खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डी येथील कार्यालयासमोर राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने लाक्षणिक  उपोषण करण्यात येणार आहे.

देशात सार्वजनिक, सहकारी व खाजगी क्षेञातील सुमारे १ कोटी पेन्शनधारक कर्मचारी ई.पी.ऐस ९५ योजनेत सहभागी आहेत. सन १९९५ पासून संबंधित कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा ४१७ ते १२५० अशी रक्कम या योजनेकडे वर्ग करण्यात आलेली आहे. पण या पैन्शानधारकांना केवळ १००० ते २५०० अशी नाममाञ पेन्शन मिळत आहे. यात ७५००आधिक महागाई भत्ता अशी वाढ करावी आशी मागणी राष्ट्रिय संघर्ष समिती गेल्या दहा वर्षांपासून करत आहे. याच मागण्यासांठी आज उपोषण केले जाणार  असल्याचे पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर, उपाध्यक्ष भगवंत वाळके, संघटक बापूराव बहिरट, जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, आशाताई शिंदे आदींनी केले.

COMMENTS