बीड : बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी धानोरा रोड परिसरातील अनेक वर्षांपासूनची अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी त

बीड : बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी धानोरा रोड परिसरातील अनेक वर्षांपासूनची अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी तसेच शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. शिवसेना जिल्हा संघटक तथा गुजर समाज देवसेना जिल्हाध्यक्ष रतन गुजर यांनी या मोहिमेचे कौतुक करत, ती निष्पक्षपणे राबवावी अशी मागणी केली आहे.
धानोरा रोडवर रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्याने वाहतूक व नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत होता. नगरपरिषद प्रशासनाने धाडसी पाऊल उचलून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रतन गुजर यांनी म्हटले आहे की, अनेक व्यापार्यांनी कायदेशीर मार्गाने दुकाने खरेदी किंवा भाड्याने घेतली असूनही काही जण सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करून व्यवसाय करत असल्याने प्रामाणिक व्यापार्यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे ही मोहीम योग्य असून सर्व स्तरांतून तिचे स्वागत होत आहे. मात्र, कारवाई करताना कोणताही भेदभाव होऊ नये, अशी स्पष्ट अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. सामान्य नागरिकांची अतिक्रमणे हटवून प्रभावशाली व्यक्तींची अतिक्रमणे कायम राहिल्यास प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण होतील, असेही त्यांनी नमूद केले. नगरपरिषदेने ही मोहीम पारदर्शक व समान पद्धतीने राबवल्यास शहराचे सुशोभीकरण होऊन वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा होईल, असा विश्वासही रतन गुजर यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS