Homeताज्या बातम्या

भाजी मंडईत केंद्रेकर यांनी आखून दिलेली ‘लक्ष्मण रेषा’ कुचकामी ठरणार काय?जनता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रिजवान बागवान यांचा सवाल

बीड : शहरातील भाजी मंडईच्या मुख्य रस्त्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी आखून दिलेली ‘लक्ष्मण रेषा’ आता कुचकामी ठरणार काय, असा सवा

महिला सक्षमीकरणासाठी ‘तुलसी क्रिएशन’चा उपक्रम प्रेरणादायी – महापौर वंदनाताई मगरे
पत्रकार महेश वाघमारे यांना मातृशोक
शिक्षणाच्या जोरावर मिळवले यशकु. निशिगंधा ओगलेची मंत्रालयात लिपिक पदावर निवड


बीड : शहरातील भाजी मंडईच्या मुख्य रस्त्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी आखून दिलेली ‘लक्ष्मण रेषा’ आता कुचकामी ठरणार काय, असा सवाल जनता फाउंडेशन, बीडचे संस्थापक अध्यक्ष रिजवान बागवान यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, काही दिवसांपूर्वी भाजी मंडईच्या मुख्य रस्त्याच्या मध्यभागी बसून भाजीपाला विक्री करणार्‍यांवर प्रशासनाच्या आदेशानुसार बीड नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांनी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती. ही कारवाई योग्य व जनहिताची असतानाही काही व्यक्तींनी त्यात राजकारण आणले, तर काहींनी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणानंतर निर्माण झालेल्या दबावामुळे काही लोकप्रतिनिधी व सत्ताधार्‍यांनी संबंधित विक्रेत्यांची घरी जाऊन भेट घेत माफी मागितल्याचे तसेच आर्थिक मदत व इतर साहित्य दिल्याचे प्रकार घडल्याचा आरोप बागवान यांनी केला आहे. त्यामुळे केवळ बीड शहरच नव्हे तर जिल्हाभरात नगरपालिकेच्या कार्यपद्धतीची चर्चा झाली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेचे आदेश देणार्‍यांनीच नंतर या कारवाईत सहभागी असलेल्या एका अधिकार्‍याला निलंबित केले, तर दुसर्‍या अधिकार्‍याला कारणे दाखवा नोटीस बजावली. या घडामोडींमुळे राजकारण किती खालच्या स्तरावर गेले आहे, हे दिसून येत असल्याची टीकाही त्यांनी केली. बागवान यांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणाहून संबंधित विक्रेत्याला हटविण्यात आले होते, त्याच ठिकाणी आता चार ते पाच नवीन विक्रेते व्यवसाय करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक आणि नागरिकांच्या ये-जा करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. याशिवाय, संबंधित विक्रेत्याचा मुलगा मंडईत येऊन ‘लक्ष्मण रेषे’च्या आत व्यवसाय करणार्‍या इतर विक्रेत्यांनाही धमकावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही नेते व लोकप्रतिनिधींची नावे घेत तो विक्रेत्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे बागवान यांनी म्हटले आहे. लक्ष्मण रेषा काही नाही, आता कोण आम्हाला रस्त्यावरून हटवितो ते पाहतो, अशा प्रकारची भाषा वापरून तो इतर विक्रेत्यांना धमकावत असल्याचा दावा प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. त्यामुळे मंडईतील भाजीपाला व फळ विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, त्याला नेमके कोणाचे पाठबळ आहे, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.शासन, प्रशासन, नगरपालिका आणि पोलीस यंत्रणा या सर्वांच्या दृष्टीने रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणे चुकीचे असून, सर्व विक्रेत्यांनी आखून दिलेल्या मर्यादेतच व्यवसाय करणे जनहिताचे असल्याचे बागवान यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, ‘लक्ष्मण रेषे’च्या आत आणि बाहेर कोणालाही व्यवसाय करू देणार नाही, अशा प्रकारच्या धमक्यांमागे नेमका उद्देश काय आहे, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान निलंबित करण्यात आलेल्या अधिकार्‍याला सन्मानपूर्वक सेवेत पुन्हा घेण्यात यावे, दुसर्‍या अधिकार्‍याला देण्यात आलेली कारणे दाखवा नोटीस मागे घ्यावी आणि अतिक्रमणधारकांचे तुष्टीकरण व लांगूलचालन थांबवावे, अशी मागणीही जनता फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

COMMENTS