Homeताज्या बातम्या

नाशिकमध्ये पावसाची हजेरी

नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना  अखेर मंगळवारी (दि.२) पावसाने काहीसा दिलासा दिला. दुपारी

सोशल मीडियाच्या वादातून हल्ला
81 लाख महिलांना वगळले बहिणींनो सरकारवर 420 चा गुन्हा दाखल करा – प्रा. सुशीलाताई मोराळे
सुनेच्या हल्ल्यात वृद्ध सासूचा मृत्यू
Heavy rains in Nashik; Godavari river near danger mark in city - The Economic Times


नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कडक उन्हामुळे हैराण झालेल्या नाशिककरांना  अखेर मंगळवारी (दि.२) पावसाने काहीसा दिलासा दिला. दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन शहराच्या विविध भागांत जोरदार वारे वाहत पावसाने हजेरी लावली.
  सिडको, गंगापूर रोड, सातपूर, जुने नाशिक, शालीमार, पंचवटी आदी भागात पावसाने हजेरी लावली. मान्सूनपूर्व या पहिल्याच पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद लहान मुलांनी घेतला. सोसाट्याच्या वाऱ्यासह काही काळ आलेल्या पावसाच्या जोरदार सरींनी एकच धावपळ उडाल्याचे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळाले. अचानक आलेल्या या सरींनी उघडयावर विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांची मात्र आपला माल सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र शहराच्या विविध भागात दिसून आले.
  गेल्या काही दिवसांपासून शहराचे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले होते. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत होते. अशा वातावरणात मंगळवारी दुपारनंतर अचानक आकाशात ढग जमा झाले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
 हवामानात झालेल्या या बदलामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.सोसाट्याचा वारा असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि झाडांखाली उभे राहणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाच्या आगमनामुळे नाशिकचे जनजीवन सुखद झाले असून, वातावरणातील उष्म्यात मोठी घट झाली आहे.

COMMENTS