अंबाजोगाई : चनई येथे लोकमाता, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुर

अंबाजोगाई : चनई येथे लोकमाता, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी गावच्या सरपंच रोहिणी सावरे, उपसरपंच अनिल शिंदे, ग्रामसेवक देशमुख साहेब, बार्टीचे समतादूत व्यंकटेश जोशी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांची न्यायप्रियता, लोककल्याणकारी दृष्टिकोन आणि आदर्श प्रशासनाचा वारसा समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
वक्त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रजाहिताला सर्वोच्च स्थान देऊन पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श निर्माण केला. समाजहित, धर्मकार्य आणि जनसेवेच्या माध्यमातून त्यांनी इतिहासात अजरामर स्थान मिळविले असून त्यांचे कार्य आजही मार्गदर्शक आहे. या कार्यक्रमास गावातील महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली होती.

COMMENTS