Homeताज्या बातम्या

अल्पसंख्यांक संरक्षण कायदा लागू करा; बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांना निवेदन

बीड : अल्पसंख्यांक समाजाच्या संरक्षणासाठी स्वतंत्र 'अल्पसंख्यांक संरक्षण कायदा' लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी अल्पसंख्यांक संरक्षण संघर्

आगामी पावसाच्या सुरुवातीला बीड शहरातील सर्व ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवा; अ‍ॅड. गोविंद शिराळे यांची मागणी
नवनीत काँवत यांच्या प्रेरणेने नव्या पोलीस पाटलांचा जनसेवेचा निर्धार..!बीडच्या नव्या पोलीस पाटलांना कर्तव्य, जबाबदारी आणि जनसेवेचे प्रेरणादायी मार्गदर्शन700 हून अधिक पोलीस पाटलांचा उत्स्फूर्त सहभाग
परिचारिका दिनानिमित्त बीड जिल्हा रुग्णालयात परिचारिकांचा सन्माननिर्भीड पत्रकार संघाच्या वतीने फुल देऊन व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव

बीड : अल्पसंख्यांक समाजाच्या संरक्षणासाठी स्वतंत्र ‘अल्पसंख्यांक संरक्षण कायदा’ लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी अल्पसंख्यांक संरक्षण संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे अल्पसंख्यांक संरक्षण कायद्याची मागणी आगामी विधानसभेत प्रभावीपणे मांडावी, अशी विनंती त्यांना करण्यात आली.

शिष्टमंडळाशी संवाद साधताना आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, “मी नेहमी सर्व समाजघटकांच्या पाठीशी उभा राहिलो असून यापुढेही राहणार आहे. अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी सरकारने यासंदर्भात तातडीने कायदा करण्याची आवश्यकता आहे. हा विषय शासनाच्या पातळीवर पोहोचवून विधानसभेत मांडण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”

अल्पसंख्यांक समाजावर होणारे वाढते हल्ले, द्वेषपूर्ण वक्तव्ये आणि मॉब लिंचिंगसारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या हक्क व सुरक्षेसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा करण्याची अत्यंत गरज असल्याचे शिष्टमंडळाने यावेळी अधोरेखित केले. याप्रसंगी अल्पसंख्यांक संरक्षण संघर्ष समितीचे मुजतबा खान, प्रा. इलियास इनामदार, प्रा. शेख अमर, अ‍ॅड. जेबा शेख, शेख मुसा, अ‍ॅड. मोमीन अखिल यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS