बीड : संतांची परंपरा आणि आध्यात्मिक वारसा लाभलेली बीड जिल्ह्यातील गोरक्षनाथ टेकडी ही नाथ संप्रदायाची पवित्र भूमी आहे. सद्गुरू किसान बाबा महाराज य
बीड : संतांची परंपरा आणि आध्यात्मिक वारसा लाभलेली बीड जिल्ह्यातील गोरक्षनाथ टेकडी ही नाथ संप्रदायाची पवित्र भूमी आहे. सद्गुरू किसान बाबा महाराज यांच्या त्यागातून आणि गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या अथक परिश्रमातून या टेकडीची व्याप्ती वाढली आहे, असे प्रतिपादन तपोनिधी शांतीब्रह्म ह.भ.प. महादेव महाराज तात्या चाकरवडीकर यांनी केले.
अधिकमास पौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे आयोजित हरिकीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील संत परंपरेचा गौरव करत संत नगद नारायण महाराज, संत बंकट स्वामी, संत वामनभाऊ, संत भगवान बाबा, संत माऊली दादा चाकरवाडी तसेच महादेव मळी येथील भगवान बाबा यांसारख्या संतांच्या महान कार्याचा उल्लेख केला.
कीर्तनात त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या ‘हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा ॥’ या प्रसिद्ध अभंगाचे सखोल विवेचन केले. मानवाच्या जीवनाला प्रेममय, आनंददायी आणि संस्कारक्षम बनविण्यासाठी ‘संतसंग’ ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकमासानिमित्त आयोजित या कीर्तन सोहळ्याला परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. कार्यक्रमानंतर बाभळखुट्टा ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

COMMENTS