Homeताज्या बातम्या

मुदखेड काँग्रेस कमिटी कार्यालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

मुदखेड : शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार, दि. ३१ मे रोजी ठाकरे चौक येथील शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर य

शासनाच्या योजनांमागे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारांची प्रेरणा; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन
पुढच्या १० दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची चौंडीत मोठी घोषणा
अहिल्यादेवींच्या जयंतीपूर्वी चोंडी मार्गाची दुरुस्ती करा; रस्त्याची दयनीय अवस्था, नागरिकांची मागणी
धुळे : अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आजपासून भाजपतर्फे विविध  उपक्रम

मुदखेड : शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार, दि. ३१ मे रोजी ठाकरे चौक येथील शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आदरपूर्वक साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ माजी नगरसेवक गोविंद गोपनपल्ले यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या समाजहितकारी कार्याचा, न्यायप्रिय प्रशासनाचा आणि लोककल्याणकारी शासनपद्धतीचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.

यावेळी माजी नगरसेवक गोविंद गोपनपल्ले, माजी नगरसेवक गंगाधर डांगे, गटनेता प्रतिनिधी तथा शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पठाण, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गिरीश कोत्तावार, सुभाष चौदंते, शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष वेदांत शेवटे, विठ्ठल आचार्य, सामाजिक कार्यकर्ते रमेश बोडके, शेख गौसभाई फुलवाले, मोहनभाई फुलवाले, गंगाधर पाटील मगरे तसेच शेख अनिसभाई नायगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श समाजाने स्वीकारण्याची गरज व्यक्त केली. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

COMMENTS