आज १ जून २०२६, म्हणजेच नवीन महिन्याची सुरुवात झाली आहे. पण या नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा कात्री लागली आहे. देश

आज १ जून २०२६, म्हणजेच नवीन महिन्याची सुरुवात झाली आहे. पण या नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा कात्री लागली आहे. देशात आजपासून अनेक मोठे आर्थिक बदल लागू झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या बजेटवर होणार आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर महागण्यापासून ते मारुतीची कार खरेदी करण्यापर्यंत आणि युपीआय (UPI) व्यवहारांपर्यंत नेमके काय बदल झाले आहेत? चला तर मग जाणून घेऊयात आजपासून लागू झालेले ५ मोठे बदल!
या यादीतील पहिला बदल म्हणजे एलपीजी सिलेंडरचे नवीन दर! दर महिन्याप्रमाणे तेल कंपन्यांनी आज नवीन दर जाहीर केले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे घरगुती वापराच्या १४ किलोच्या सिलेंडर दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, १९ किलोच्या व्यावसायिक (Commercial) सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. २०२६ मधील ही आतापर्यंतची सातवी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर ४२ रुपयांनी महाग होऊन ३११३.५० रुपयांवर पोहोचला आहे, तर कोलकातामध्ये तब्बल ५२.५० रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे.
याशिवाय, पेट्रोलियम मंत्रालयाने नवीन नियम कडक केला आहे. जर तुमच्याकडे पीएनजी (PNG) कनेक्शन असेल, तर तुम्हाला पुढील ३० दिवसांत आपले एलपीजी कनेक्शन सरेंडर करावे लागेल.
सरा मोठा फटका कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांना बसला आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या गाड्यांच्या किमती वाढवल्या असून नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. कंपनीने अल्टो, ब्रेझा आणि व्हिक्टोरिया यांसारख्या लोकप्रिय मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. वेगवेगळ्या मॉडेल्सनुसार ही दरवाढ कमाल ३० हजार रुपयांपर्यंत असणार आहे. त्यामुळे आता मारुतीची कार घेण्याचं स्वप्न थोडं महाग पडणार आहे.
तिसरा बदल बँकिंग क्षेत्राशी संबंधित आहे. १ जून २०२६ पासून एचडीएफसी (HDFC) बँकेने चालू खात्यांसह (Current Accounts) अनेक खात्यांच्या कॅश डिपॉझिट नियमांमध्ये बदल केला आहे. नवीन नियमांनुसार, २० रुपये किंवा त्यापेक्षा लहान नोटा जमा करण्याची मासिक मर्यादा १० हजार रुपये निश्चित केली आहे. तर नाणी जमा करण्यासाठी ही मर्यादा दरमहा ५ हजार रुपये असेल. या मर्यादेपेक्षा जास्त लहान नोटा किंवा नाणी जमा केल्यास ग्राहकांना २% अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे.
चौथा बदल आहे सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्यांसाठी. आजपासून सौर पॅनेलसाठी नवीन मान्यताप्राप्त मॉडेल आणि उत्पादक सूची (ALMM List-II) लागू झाली आहे. आता सरकारी योजना आणि अनुदानित प्रकल्पांमध्ये केवळ या अधिकृत सूचीमधील सोलर मॉड्यूल्स वापरता येतील. यामुळे दर्जा सुधारेल खरा, पण यामुळे सौर पॅनेलच्या किमती वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा बदल डिजिटल पेमेंट करणाऱ्या कोट्यवधी युजर्ससाठी आहे. ऑनलाइन फसवणूक आणि चुकीच्या खात्यात पैसे जाण्याची समस्या रोखण्यासाठी एनपीसीआयने (NPCI) नवीन नियम आणला आहे. आता कोणत्याही युपीआय (UPI) अॅपवरून पैसे पाठवताना, पिन (PIN) टाकण्यापूर्वीच समोरच्या व्यक्तीच्या बँक खात्यावरील खरे नाव स्क्रीनवर दिसेल. यामुळे चुकीच्या व्यक्तीला पैसे जाण्याचा धोका मोठ्या प्रमाणात टळणार आहे.
तर मित्रांनो, हे होते १ जून २०२६ पासून देशात लागू झालेले ५ मोठे आर्थिक बदल, ज्याचा फटका आणि फायदा दोन्ही सर्वसामान्यांना होणार आहे. तुम्हाला या बदलांबद्दल काय वाटते? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा

COMMENTS