बीड : व्यसन हा केवळ एक सवय नसून तो एक मानसिक आजार आहे. या आजाराला बळी न पडता प्रत्येकाने स्वतःहून आणि दृढ संकल्पाने त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्

बीड : व्यसन हा केवळ एक सवय नसून तो एक मानसिक आजार आहे. या आजाराला बळी न पडता प्रत्येकाने स्वतःहून आणि दृढ संकल्पाने त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या कविता वाघ यांनी केले. वाईट व्यसनांपासून दूर राहून प्रत्येकाने देशहित, समाजसेवा आणि सकारात्मक कार्यांचे ‘व्यसन’ जोपासले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था (पोखरी) संचलित, जनसेवा व्यसनमुक्ती केंद्र, घाटसावळी येथे आयोजित समुपदेशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
घाटसावळी येथील या सामाजिक प्रकल्पाच्या कार्याचा गौरव करताना कविता वाघ म्हणाल्या की, बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव फड, संचालक चंद्रकांत बप्पा फड आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन फड यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प अतिशय कौतुकास्पद काम करत आहे. या प्रसंगी सुनिताताई थिटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे वृद्धाश्रम व जनसेवा व्यसनमुक्ती केंद्राचे आजिनाथ शेरकर, वर्षा शेरकर, गिताराम गायकवाड, अमोल नेहरकर, सहदेव फड, संजय फड, रामनाथ मुळे, गोरख फड आणि सतिश फड यांनी विशेष परिश्रम घेतले

COMMENTS