अहिल्यानगर : पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी येथील बालिकाश्रम रस्ता परिसरात रूमवर राहणाऱ्या युवतीसोबत एका मुलाने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना श
अहिल्यानगर : पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी येथील बालिकाश्रम रस्ता परिसरात रूमवर राहणाऱ्या युवतीसोबत एका मुलाने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (२२ मे) मध्यरात्री घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संशयित अल्पवयीन मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले आहे.
मूळची जामखेड तालुक्यातील असलेली पीडित युवती बालिकाश्रम रस्ता परिसरात भाड्याच्या खोलीत राहून पोलीस भरतीचा सराव करते. घटनेच्या रात्री तिच्या खोलीतील इतर मुली गावी गेल्या असल्याने ती खोलीत एकटीच होती. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शेजारच्या खोलीत राहणाऱ्या एका मुलाने खिडकी वाजवून पिण्यासाठी पाणी मागितले. युवतीने शेजारी म्हणून ओळखीपोटी दरवाजा उघडून त्याला पाण्याची बाटली दिली.
पाणी घेतल्यानंतर तो मुलगा बाहेर न जाता जबरदस्तीने खोलीत घुसला आणि त्याने युवतीचा विनयभंग केला. युवतीने प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्याने तो मुलगा तेथून पळून गेला. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पीडित युवतीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे.

COMMENTS