Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात विकसित होणार; विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवणार

मुंबई : पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासह जलव्यवस्थापन करण्यासाठी आता जमिनीच्या सातबाराच्या धर्तीवर 'पाण्याचा सातबारा' देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात

महाराष्ट्रात आता सरकारी जमिनीवर गवत लागवड! महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वाकांक्षी योजना
तहसीलदारांनी गावात जाऊन जनतेचे प्रश्‍न सोडवावेतमहसूल मंत्री बावनकुळे यांचे निर्देश ; करमाळ्यात सह दुय्यम निबंधक कार्यालयाचे उद्घाटन
किनवट तहसीलदारांचे ‘रात्रीस खेळ चाले’ प्रकरण तापले! लाचलुचपत व बेकायदेशीर रेती उपशाप्रकरणी २९ मे रोजी सुनावणी
देशातील पहिला 'पाण्याचा सातबारा' महाराष्ट्रात India news - Tarun Bharat  Nagpur

मुंबई : पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासह जलव्यवस्थापन करण्यासाठी आता जमिनीच्या सातबाराच्या धर्तीवर ‘पाण्याचा सातबारा’ देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल, पाणीपुरवठा व स्वच्छता, ग्रामविकास विभागाच्या सचिवांसोबत आज मंत्रालयातील बैठकीत याबाबतचे भक्कम पाऊल टाकले.

जलव्यवस्थापन करणाऱ्या ‘अक्वेरियम’ (Aquarium) या संस्थेने यासाठी ‘वॉटर ऑडिट’ आणि ‘बॅलन्सशीट’ची संकल्पना मांडली असून, ही अभिनव योजना राज्यात सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. सध्या सर्वत्र जमिनीच्या नोंदीसाठी ‘सातबारा’ उतारा अस्तित्वात आहे, मात्र पाण्यासाठी अशी कोणतीही नोंद प्रणाली नाही. पाण्याला जागतिक स्तरावर जो मान आणि दर्जा मिळायला हवा, तो सध्या मिळत नाही. एकदा पाण्याचे ऑडिट झाले की, त्याचा वापर कसा करायचा याबाबत काळजी घेतली जाते. जोपर्यंत पाण्याचा वापर रेकॉर्ड केला जात नाही, तोपर्यंत त्यावर नियंत्रण राहणार नाही आणि लोकांची पाण्याचा वापर करण्याबाबतची जबाबदारीही निश्चित होणार नाही. याच उद्देशाने ‘ब्लू ग्रीन अर्बन डेव्हलपमेंट’च्या धर्तीवर हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी अक्वेरियमचे प्रमुख डॉ. सुब्रमण्यम कंसूर, जलाभ्यासक डॉ. अविनाश कदम आणि उदय नायर यांनी एकत्रितपणे ‘वॉटर अकाउंटिंग फ्रेमवर्क’ आणि ‘वॉटर बॅलन्सशीट’ची अद्ययावत संकल्पना विकसित केली आहे. या अंतर्गत पाण्याचे तीन टप्प्यांत ऑडिट केले जाणार असून, त्याचे दरवर्षी वर्गीकरण केले जाईल. या प्रणालीमुळे ग्रामपंचायत किंवा पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा साठा, आवक, जावक आणि शिल्लक पाणी याचा पारदर्शक ताळेबंद ठेवता येईल.

मंत्रालयातील महसूल विभागात आज झालेल्या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पलकुंडवार, जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापडकर यांच्यासह एवेरिएम (Aquarium) संस्थेचे प्रमुख सुब्रमण्यम कुसनूर, आयआयटी बॉम्बेचे जलाभ्यासक डॉ. अविनाश कदम, आर्थिक विषयाचे अभ्यासक उदय नायर यावेळी उपस्थित होते.

‘अक्वा क्रेडिट्स’द्वारे मिळणार प्रोत्साहन

“या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे केवळ पाण्याचे मोजमाप होणार नाही, तर पाण्याचे संवर्धन करणाऱ्यांना ‘अक्वा क्रेडिट्स’च्या (Aqua Credits) माध्यमातून प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे ग्रामीण भागात पाण्याचा वापर अधिक जबाबदारीने आणि पारदर्शकपणे होईल, व भविष्यात एक मोठी ‘वॉटर इकॉनॉमी’ उभी राहण्यास मदत मिळेल. महाराष्ट्र राज्य हा प्रयोग राबवणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.” – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

COMMENTS