Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निळवंडेच्या पाण्याचे जवळेकडलगमध्ये जलपूजन; थोरात कारखान्याच्या पुढाकारातून गावतळी भरली

संगमनेर : निळवंडे धरण व कालवे निर्माण करताना ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना अनंत अडचणी आल्या. मात्र त्यांनी हे जीवनाचे ध्येय मानून सर्व अडचणी

निळवंडेच्या पाण्याने पाझर तलाव भरले; कोपरगावच्या ग्रामस्थांकडून आमदार विवेक कोल्हे यांचे आभार
कोपरगावात निळवंडेचे पाणी आमदार आशुतोष काळे यांच्यामुळेच आले; माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे यांचा दावा
संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची आग्रही मागणी

संगमनेर : निळवंडे धरण व कालवे निर्माण करताना ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना अनंत अडचणी आल्या. मात्र त्यांनी हे जीवनाचे ध्येय मानून सर्व अडचणी सोडविल्या आणि धरण व दोन्ही कालवे पूर्ण केले. ज्यांनी या काळात कोणतेही योगदान दिले नाही, अशी मंडळी आता श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आलेले पाणी हे केवळ लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्याच परिश्रमामुळे आले आहे, असे प्रतिपादन थोरात कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी केले.

जवळे कडलग येथील धामोडी नाला येथे ‘एसकेएफ वॉल’चा (SKF Wall) शुभारंभ करण्यात आला. तसेच सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या पुढाकारातून आढळेश्वर मंदिर परिसरातील बंधारा व गावचे तळे पूर्ण क्षमतेने भरल्याने या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, कारखान्याचे संचालक गुलाबराव देशमुख, मदन आंबरे यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना पांडुरंग पाटील घुले पुढे म्हणाले की, “कोरोनाच्या काळात सर्व जग बंद असतानाही लोकनेते थोरात यांनी कालव्यांची कामे सुरू ठेवली. मोठ्या परिश्रमानंतर दोन्ही कालवे पूर्ण झाले असून मागील दोन वर्षांपासून या कालव्यांमधून पाणी येत आहे. या पाण्यामुळे हा दुष्काळी परिसर समृद्ध होणार आहे.” तर रामहरी कातोरे यांनी सांगितले की, तालुक्यातील जनतेला पाणी मिळावे याकरता थोरात कारखान्याच्या माध्यमातून पाईपलाईन देऊन ही तळी भरून देण्यात आली आहेत.

COMMENTS