Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भुतवडा तलाव पाणीपातळी खालवली; टंचाई काळात नागरिकांनी सहकार्य करावे ; नगराध्यक्षा चिंतामणींचे आवाहन

 जामखेड : सध्या उन्हाळ्यात तापमानाची उच्चतम नोंद झाली आहे. वातावरणातील उष्णतेचा मोठा परिणाम तलावातील पाणी साठ्यांवर झाला आहे. जामखेड शहराला पाणीप

अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अवकाळीचा तडाखा !
कोतुळ उपबाजार आवारात कांदा मार्केटची सुरवात; ओपन लिलाव पद्धतीमुळे चांगला दर; अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा

 जामखेड : सध्या उन्हाळ्यात तापमानाची उच्चतम नोंद झाली आहे. वातावरणातील उष्णतेचा मोठा परिणाम तलावातील पाणी साठ्यांवर झाला आहे. जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील पाणी साठा दोन महिने पुरेल इतकाच शिल्लक आहे तेव्हा नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी केले आहे.
नुकताच नगराध्यक्षांनी भुतवडा तलाव व वितरण व्यवस्थेची प्रत्यक्ष स्थळपहाणी केली. यावेळी बोलताना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या की सद्दय परिस्थितीत तलावात पुढील दोन महिने पुरेल ऐवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. लवकरच वरून राजाचे आगमन होईल आता शहरातील नागरिकांना टंचाईच्या झळा बसत आहेत ८ते १० दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. यावर उपयोजना करून तो कालावधी कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नांतून पुढील काळात जामखेडकरांना उजनीचे मुबलक पाणी मिळणार असून त्या योजनेचे काम प्रगतीपथावर आहे असे सांगितले. पाणी टंचाई काळात पाणी वापरात नागरिकांनी काटकसर करून नगरपरिषद ला सहकार्य करावे.
पाण्याची पातळी तपासली असता ती खालावलेली असून पाणीपुरवठा करण्यासाठी अवाहानाचा सामना करावा लागत आहे. त्याबाबत संबंधित विभागाना तशा सूचना देऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.
यावेळी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, पाणीपुरवठा समिती सभापती श्रीराम डोके, कैलास माने,अमित चिंतामणी,नगरसेविका नंदा होळकर,नगरसेवक विकी घायतडक,प्रवीण चोरडीया, पवन राळेभात, हर्षद काळे,मुख्याधिकारी अजय साळवे,मनोज कुलकर्णी, अर्जुन म्हेत्रे,आश्रु शेळके,सागर टकले,प्रविण होळकर आदींसह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

जामखेड नगरपरिषदेच्या मासिक मिटींगमध्ये टंचाईच्या पार्श्वभूमीवर विहित काळात उपाययोजना राबवण्याच्या संदर्भात ठराव घेण्यात आला होता. त्या आनुशंगाने ही पाहणी करण्यात आली असून प्राप्त परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील पाणी व्यवस्थापनेचे नियोजन करण्यासाठी तलावाची पहाणी केली आहे.
–   अजय साळवे, मुख्याधिकारी.

COMMENTS