Homeताज्या बातम्याअहमदनगर

बिबट्याला कोंडून ठेवणाऱ्या आजीचा सन्मान 

 संगमनेर : खरशिंदे येथील 65 वर्षीय गंगुबाई गायकवाड या आजीने अत्यंत धाडसाने घरात अचानक शिरलेल्या बिबट्याला घरातच कोंडून घेतल्याने मोठा संकटाचा प्रसंग टळला.  डॉ. जयश्री थोरात यांनी आजीशी फोन द्वारे संवाद साधत आपुलकीने चौकशी केली याचबरोबर यशोधन कार्यालयाच्या वतीने आजी व कुटुंबीयांना किराणा किट देण्यात आली.खरशिंदे येथील गंगुबाई गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट देऊन किराणा व इतर साहित्य देण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद नाना थोरात,मोसीन शेख, गीताराम पवार, सिताराम पवार, रशीद शेख, अशोक लांबहाते,  निजाम पटेल, गुलाब आमीन, पीरमोहम्मद शेख, सुभाष वाडेकर,शिवा पंडित,सोनू पंडित,साहेबराव पवार,नाना सय्यद,भाऊ शेख,रामनाथ वाडेकर, मीराबाई वाडेकर,अण्णासाहेब कोळसे,मधुकर गायकवाड,संदीप गायकवाड,सदाशिव पवार,रामदास काकड, हर्षल काकड यांच्यासह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.घरामध्ये अचानक शिरलेल्या बिबट्याच्या धोका ओळखून प्रसंगावधान राखत 65 वर्षीय गंगुबाई गायकवाड यांनी अत्यंत धाडसाने या बिबट्याला घरात कोंडून घेतले. यामुळे मोठे संकट टळले असून या धैर्याने संपूर्ण तालुक्यासमोर एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. या घटनेची चौकशी करत काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आजीच्या धाडसाचे कौतुक केले. याचबरोबर यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून किराणा किट व इतर साहित्य त्यांना देण्यात आले.कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्या डॉ.जयश्रीताई थोरात यांनी फोन द्वारे अत्यंत आपुलकीने 65 वर्षीय गायकवाड आजीबरोबर संपर्क साधला. यावेळी त्यांच्या तब्येतीची चौकशी करत आजीने केलेल्या धाडसाचे कौतुक करून नव्या पिढी पुढे तुम्ही आदर्श उभा केला तुम्हाला नक्की भेटायला येते अशा त्या म्हणाल्या.तर 65 वर्षी आजी म्हणाल्या की, मी बिबट्या पाहिला तेव्हा मला वाटले की हा वाघ आहे. हा आपल्यावर चालून येईल घरामध्ये लहान मुले आहे तेव्हा तो घरात शिरला आणि मी धाडसाने दरवाजा बंद केला. त्याने डरकाळी दिल्या परंतु मी घाबरले नाही. अत्यंत ताकतीने दरवाजा बंद केल्याने तो आत मधून मोठ्याने ओरडत होता. त्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले आणि मग आम्हाला धीर आला.

कर्जतमध्ये गोवंश तस्करांवर कारवाई; ९.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त
कर्जतच्या राजकारणात अतिक्रमणावरून महासंग्राम गरिबांचा संसार उद्ध्वस्त होऊ देणार नाही; नगराध्यक्षा रोहिणी गुंड सभापती राम शिंदे विरुद्ध नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष आमनेसामने
शाईफेक नव्हे, विचारांवरचा हल्ला!

COMMENTS