Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

नीटप्रमाणेच एमएच-सीईटी परीक्षेत गैरप्रकारकाँगे्रस नेते सचिन सावंतांचा आरोप ; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

मुंबई : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणार्‍या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता राज्यातील एमए

नीट घोटाळ्यातील आरोपी पी. व्ही. कुलकर्णीने स्वतःच्याच इमारतीवर चालवला बुलडोझर
22 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात पेपर लीक प्रकरणात सीबीआय चौकशी करा- नितीन सोनवणेभारत सरकारचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या
नीट फेरपरीक्षेलाही पेपरफुटीचे सावट?; ‘20 लाखांत 620+ गुण’ मिळवून देण्याचे आमिष, सोशल मीडियावर एजंटांची टोळी सक्रियफेरपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकाच विक्रीसाठी असल्याचा दावा; विद्यार्थी-पालकांची फसवणूक करण्याचा संशय, नांदेडमध्येही चर्चांना उधाण


मुंबई : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणार्‍या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता राज्यातील एमएच-सीईटी परीक्षेबाबतही गंभीर प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत एमएच-सीईटी परीक्षेतही मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
सावंत यांनी सांगितले की, वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित घोटाळ्यामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित परीक्षांमध्ये जर गैरप्रकार होत असतील, तर तो केवळ विद्यार्थ्यांचाच नव्हे तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्‍वासाचा प्रश्‍न असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, एमएच-सीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम अकरावी आणि बारावीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारित असतो. मात्र, दहावी व बारावीमध्ये अत्यल्प गुण मिळवलेल्या काही विद्यार्थ्यांनी एमएच-सीईटीमध्ये शंभर टक्के गुणमान मिळवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परीक्षेच्या प्रक्रियेवर संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले. सावंत यांनी काही उदाहरणे देत प्रश्‍न उपस्थित केले. दहावीत अवघे 37 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला एमएच-सीईटीमध्ये 99.971 गुणमान मिळाले, तर बारावीत सुमारे 51 टक्के गुण मिळवलेल्या दोन विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुणमान मिळवले असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच 45 टक्के, 39 टक्के आणि अगदी 35 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही एमएच-सीईटीमध्ये शंभर टक्के गुणमान मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकाराची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणताही खेळ होऊ नये, अशी मागणी सावंत यांनी केली.

COMMENTS