Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

चिरली रोडवर तलवारीसह युवक ताब्यात ; कुंडलवाडी पोलिसांची कारवाई

 कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळगाव ते चिरली रोडवर विनापरवाना धारदार तलवार बाळगणार्‍या एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाब

शिरपूरात संतापजनक घटना : सुनेसमोर रागावल्याच्या कारणावरून मुलानेच आई-वडिलांचा खून; खलबत्ता-मुसळाने केला निर्दयी प्रहार
गोदावरीत अवैध रेती उपशावर पोलिसांचा मोठा प्रहार; 1 कोटींचा मुद्देमाल जप्त
रात्री डीजेवर बंदी; राहुरी पोलिसांची कठोर भूमिका 



 कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळगाव ते चिरली रोडवर विनापरवाना धारदार तलवार बाळगणार्‍या एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 54/2026 अन्वये भारतीय शस्त्र कायदा कलम 4, 25 आर्म अ‍ॅक्ट तसेच कलम  135 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादी शिवराज संभाजी गंगुलवार (वय 38) पोलीस ठाणे कुंडलवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सचिन विश्वनाथ खंडगावे वय 25, व्यवसाय मजुरी, रा. चिरली  याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. दिनांक 14 मे 2026 रोजी दुपारी 3.50 वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव ते चिरली रोडवर आरोपी हा संशयितरीत्या फिरत असताना पोलिसांनी त्याची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या ताब्यात शासनाने प्रतिबंधित केलेली अंदाजे 32 इंच लांबीची धारदार तलवार आढळून आली. सदर तलवारीचे पाते अंदाजे 27 इंच लांब असून स्टीलची मुठ व लाल रंगाचे कव्हर असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त करण्यात आलेल्या तलवारीची अंदाजे किंमत 3 हजार 500 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सदर कारवाई सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर, पोको श्रीपत ढगे पाटील, शिवराज गंगुलवार, रघुवीर चव्हाण, रवींद्र देशमुख व व्यंकट घोंगडे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माधव पाटील पोलीस उपनिरीक्षक हे करीत आहेत.

COMMENTS