सोनई : श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानाच्या दानपात्राची मोजदाद मंगळवार दि. १२ मे रोजी करण्यात आली. या वेळी दानपात्रातून एक

सोनई : श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानाच्या दानपात्राची मोजदाद मंगळवार दि. १२ मे रोजी करण्यात आली. या वेळी दानपात्रातून एकूण ३८ लाख ५९ हजार २१५ रुपये इतकी रोख रक्कम जमा झाल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात झाले.शनैश्वर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांच्या देखरेखीखाली ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली. दानपात्र उघडल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे आणि व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून पारदर्शक पद्धतीने रोख रकमेची मोजदाद करण्यात आली.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार श्री शनैश्वर देवस्थानचा प्रशासकीय कारभार नाशिक विभागीय आयुक्त तथा प्रशासक प्रवीण गेडाम यांच्याकडे आहे. देवस्थानच्या दैनंदिन कामकाजासाठी उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे हे कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.दानपात्रातील ३८लाख ५९हजार २१५ रुपये रक्कम मोजदादीनंतर जमा झालेली संपूर्ण रक्कम देवस्थानच्या अधिकृत बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दानपात्र प्रत्येक महिन्याला मोजण्यात येते. देवस्थान परिसरात सुमारे १८दानपात्र आहेत.दानपात्रातील रकमेची मोजदाद शनि मंदिरासमोरील उदासी महाराज मठात करण्यात येते, ज्यामुळे उपस्थित शनि भक्तांना ही प्रक्रिया प्रत्यक्ष पाहता येते. संपूर्ण मोजदादीचे व्हिडिओ चित्रीकरण करून पारदर्शकता राखली जाते.शनि भक्तांकडून श्रद्धापूर्वक अर्पण करण्यात आलेल्या देणगीमुळे देवस्थानाच्या विविध धार्मिक, सामाजिक आणि विकासकामांना बळ मिळत असून, मंदिर प्रशासनाकडून निधीचा योग्य वापर करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

COMMENTS