अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील पाच महत्त्वाच्या व्यापारी संकुल प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रकल्पांसाठी आवश्यक निधीपैकी ७५ टक्के निधी कर्जाच्या माध्यमातून उभारण्यात येणार असून त्यासाठी शहरातील बँकांकडून प्रस्ताव मागविण्यात आल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.महानगरपालिकेच्या प्रस्तावित प्रकल्पांमध्ये चितळे रोड येथील नेहरू मार्केट विकास प्रकल्पाचा समावेश असून त्याची एकूण किंमत ११ कोटी ४२ लाख रुपये आहे. या प्रकल्पासाठी ८ कोटी ५६ लाख रुपयांच्या कर्जाची आवश्यकता आहे.सर्जेपुरा रंग भवन येथे व्यापारी संकुल व सांस्कृतिक केंद्र विकसित केले जाणार असून, या ३३.६१ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी २५.२१ कोटी रुपयांचे कर्ज अपेक्षित आहे. याशिवाय प्रोफेसर कॉलनी चौक येथे २७.४८ कोटी रुपयांचे व्यापारी संकुल उभारले जाणार असून त्यासाठी २०.८६ कोटी रुपयांचा वित्तपुरवठा आवश्यक आहे. अहिल्यानगर-मनमाड रोडवरील जुने एनसीसी कार्यालय येथे नियोजित व्यापारी संकुलाची किंमत ३०.४८ कोटी रुपये असून याकरिता २२.८६ कोटी रुपयांची कर्ज आवश्यक आहे.तसेच, गंज बाजार येथे ११.७० कोटी रुपये खर्चुन भाजी मंडई व व्यापारी संकुल उभारण्यात येणार असून त्यासाठी ८.७७कोटी रुपयांच्या कर्जाची आवश्यकता आहे. या प्रकल्पांसाठी दीर्घकालीन कर्ज, स्पर्धात्मक व्याजदर, परतफेडीचा कालावधी आणि इतर आवश्यक अटी व शर्तीचा समावेश असलेला सविस्तर प्रस्ताव बँकांनी सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.नवीन व्यापारी संकुलांमधील गाळ्यांचा ई-लिलाव करून त्यातून मिळणारी रक्कम, गाळेधारकांकडून ३० वर्षांच्या लीजवर ‘नॉन-रिफंडेबल डिपॉझिट’ जमा केले जाईल आणि सोबतच गाळ्यांचे मासिक भाडे मिळेल व यातून कर्जाची रक्कम फेडण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या संकुलाच्या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल, असा विश्वास आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केला. कोठे किती कर्ज अपेक्षित? -चितळे रोडवरील नेहरू मार्केट विकास प्रकल्पासाठी ८.५६ कोटी -सर्जेपुरात व्यापारी संकुल व सांस्कृतिक केंद्रासाठी २५.२१ कोटी -प्रोफेसर कॉलनी चौक येथे व्यापारी संकुलसाठी २०.८६ कोटी -अहिल्यानगर-मनमाड रोडवरील व्यापारी संकुलासाठी २२.८६ कोटी -गंज बाजार येथे भाजी मंडई व व्यापारी संकुलासाठी ८.७७ कोटी

अहिल्यानगर : महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील पाच महत्त्वाच्या व्यापारी संकुल प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रकल्पांसाठी आवश्यक निधीपैकी ७५ टक्के निधी कर्जाच्या माध्यमातून उभारण्यात येणार असून त्यासाठी शहरातील बँकांकडून प्रस्ताव मागविण्यात आल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.महानगरपालिकेच्या प्रस्तावित प्रकल्पांमध्ये चितळे रोड येथील नेहरू मार्केट विकास प्रकल्पाचा समावेश असून त्याची एकूण किंमत ११ कोटी ४२ लाख रुपये आहे. या प्रकल्पासाठी ८ कोटी ५६ लाख रुपयांच्या कर्जाची आवश्यकता आहे.सर्जेपुरा रंग भवन येथे व्यापारी संकुल व सांस्कृतिक केंद्र विकसित केले जाणार असून, या ३३.६१ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी २५.२१ कोटी रुपयांचे कर्ज अपेक्षित आहे. याशिवाय प्रोफेसर कॉलनी चौक येथे २७.४८ कोटी रुपयांचे व्यापारी संकुल उभारले जाणार असून त्यासाठी २०.८६ कोटी रुपयांचा वित्तपुरवठा आवश्यक आहे. अहिल्यानगर-मनमाड रोडवरील जुने एनसीसी कार्यालय येथे नियोजित व्यापारी संकुलाची किंमत ३०.४८ कोटी रुपये असून याकरिता २२.८६ कोटी रुपयांची कर्ज आवश्यक आहे.तसेच, गंज बाजार येथे ११.७० कोटी रुपये खर्चुन भाजी मंडई व व्यापारी संकुल उभारण्यात येणार असून त्यासाठी ८.७७कोटी रुपयांच्या कर्जाची आवश्यकता आहे. या प्रकल्पांसाठी दीर्घकालीन कर्ज, स्पर्धात्मक व्याजदर, परतफेडीचा कालावधी आणि इतर आवश्यक अटी व शर्तीचा समावेश असलेला सविस्तर प्रस्ताव बँकांनी सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.नवीन व्यापारी संकुलांमधील गाळ्यांचा ई-लिलाव करून त्यातून मिळणारी रक्कम, गाळेधारकांकडून ३० वर्षांच्या लीजवर ‘नॉन-रिफंडेबल डिपॉझिट’ जमा केले जाईल आणि सोबतच गाळ्यांचे मासिक भाडे मिळेल व यातून कर्जाची रक्कम फेडण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या संकुलाच्या माध्यमातून महापालिकेला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल, असा विश्वास आयुक्त यशवंत डांगे यांनी व्यक्त केला.
कोठे किती कर्ज अपेक्षित?
-चितळे रोडवरील नेहरू मार्केट विकास प्रकल्पासाठी ८.५६ कोटी
-सर्जेपुरात व्यापारी संकुल व सांस्कृतिक केंद्रासाठी २५.२१ कोटी
-प्रोफेसर कॉलनी चौक येथे व्यापारी संकुलसाठी २०.८६ कोटी
-अहिल्यानगर-मनमाड रोडवरील व्यापारी संकुलासाठी २२.८६ कोटी
-गंज बाजार येथे भाजी मंडई व व्यापारी संकुलासाठी ८.७७ कोटी

COMMENTS