Homeताज्या बातम्याराजकारण

बीडच्या राजकारणात ‘रणसंग्राम’; पंडित-क्षीरसागर आमनेसामने, आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले

जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच

वक्फ मंडळात तोंड बघून कामे केली जात आहेत का? महत्त्वाच्या प्रकरणांकडे दुर्लक्षदहा दिवसांत मंडळ बरखास्त करा, अन्यथा जनआंदोलन-शेख नदीम
दरोडा व बलात्काराच्या गुन्हयात आरोपीस 10 वर्षे सक्तमजुरी
जिल्हा परिषदेतील अतिरिक्त कामकाज नावाखाली चालणारा प्रतिनियुक्तयांचा बाजार उठवला !डॉ. गणेश ढवळे यांच्या पाठपुराव्याला यश

जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. विकासाच्या मुद्द्यांपासून सुरू झालेला वाद आता थेट राजकीय संघर्षात परिवर्तित झाल्याचे चित्र दिसत आहे.
दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात असून, सोशल मीडियापासून सभांपर्यंत आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया देताना, बीडवरती प्रेम दाखवतात आणि सगळं गेवराईला घेऊन जातात. आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही आम्हाला शिकवू नका. या मतदारसंघाने आम्हाला दोनदा आमदार केलं आहे. आम्ही दररोज रस्त्यावर फिरून काम करतो, असे वक्तव्य केले. दरम्यान, या राजकीय संघर्षामुळे जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. आरोपांच्या फैरींमुळे राजकारण तापले असले तरी जनतेच्या नजरा आता प्रत्यक्ष कामगिरीकडे लागल्या आहेत. बीडच्या राजकारणातील हा ‘रणसंग्राम’ आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS