Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हनुमान कथायज्ञ शोभा यात्रेचे पुष्पवृष्टीने स्वागत

नंदनवन लॉन्समध्ये प्रवचन सुरू, उद्या यज्ञयागाचे आयोजन

अहमदनगर/प्रतिनिधी ः हनुमान चालिसा अखंड पठणास दोन तप म्हणजे तब्बल 24 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येथील नंदनवन लॉन्समध्ये श्री हनुमान कथा सोहळा व हनुमा

कोपरगाव-शिर्डीत एस.टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले (Video)
मंजूर गावातून लाख रुपयेचा गांजा जप्त
2500 शिक्षकांचा ऑनलाईन परीक्षेवर बहिष्कार

अहमदनगर/प्रतिनिधी ः हनुमान चालिसा अखंड पठणास दोन तप म्हणजे तब्बल 24 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येथील नंदनवन लॉन्समध्ये श्री हनुमान कथा सोहळा व हनुमान यागाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी सोमवारी (3 एप्रिल) दुपारी काढण्यात आलेल्या शोभा यात्रेवर भाविकांनी पुष्पवृष्टी केली. त्यानंतर स्वामी गोविंददेव गिरी यांची हनुमान कथा प्रवचनास सुरुवात झाली. दरम्यान, उद्या बुधवारी (5 एप्रिल) व गुरुवारी (6 एप्रिल) येथे हनुमान यागनिमित्त 108 दाम्पत्यांद्वारे होमहवन होणार आहे

गंजबाजारातील श्रीलक्ष्मीनारायण मंदिरामधील लक्ष्मीनारायण सत्संग मंडळाने आयोजित केलेल्या श्रीहनुमान कथा सोहळ्याचा प्रारंभ थाटात काढण्यात आलेल्या सवाद्य शोभा यात्रेने करण्यात आला. नवीन टिळक रोडलगतच्या पटेल मंगल कार्यालयापासून शोभायात्रा सुरू झाली. शोभायात्रेच्या अग्रभागी बॅण्डपथक होते. त्यामागे लक्ष्मीनारायण सत्संग मंडळाचे पुरुष व महिला भाविक सहभागी झाले होते. महिलांनी सजविलेले मंगल कलश डोक्यावर घेतले होते. सुशोभित बग्गीमध्ये लक्ष्मीनारायणाची प्रतिमा आणि श्रीहनुमान माहात्म्य ग्रंथ विराजमान होता. तसेच दुसर्‍या बग्गीमध्ये स्वामी गोविंददेव गिरी महाराज स्थानापन्न होते. उत्साहपूर्ण वातावरणात ही शोभायात्रा नंदनवन लॉनमध्ये आली. शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होते.

नंदनवन लॉनच्या प्रवेशव्दाराजवळ गुलाबाच्या फुलांची पुष्पवृष्टी करीत शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. भगवान श्रीरामांच्या व हनुमानांच्या जयघोषाने परिसरातील वातावरण दुमदुमले. उन्हाचा कडाका न जुमानता भाविकांनी शोभायात्रेस अलोट गर्दी केली होती. शोभायात्रा नंदनवन लॉनमध्ये आल्यानंतर तीन दिवसीय कथा सोहळ्याचा विधिवत शुभारंभ करण्यात आला.

COMMENTS