Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल लांबणीवरमाजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह 10 जणांवर आरोप

मुंबई : राज्यभरात चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणाचा निकाल आज विशेष केंद्रीय अन्वेषण न्यायालयाकडून जाहीर होण्याची अपेक्षा हो

विवेक कोल्हे १४ मे रोजी घेणार विधान परिषदेत शपथ
रात्री डीजेवर बंदी; राहुरी पोलिसांची कठोर भूमिका 
मिरजगाव परिसरात मृतदेह आढळला


मुंबई : राज्यभरात चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणाचा निकाल आज विशेष केंद्रीय अन्वेषण न्यायालयाकडून जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र, एका आरोपीची प्रकृती अस्वस्थ असल्याने तो न्यायालयात उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे न्यायालयाने निकालाचे वाचन आता 16 जूनपर्यंत पुढे ढकलले आहे.
या प्रकरणात राज्याचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह दहा जणांवर आरोप आहेत. गेली जवळपास दोन दशके सुरू असलेल्या या खटल्याकडे निंबाळकर कुटुंबासह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या हत्याकांडाने त्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती. 3 जून 2006 रोजी धाराशिव जिल्ह्यातील प्रभावशाली नेते पवनराजे निंबाळकर यांच्यावर परंडा-कळंब मार्गावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात पवनराजे आणि त्यांच्या वाहनचालकाचा मृत्यू झाला होता. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे राज्यभर संताप व्यक्त झाला होता. सुरुवातीला तपास स्थानिक पोलिसांकडे होता. मात्र, प्रकरणातील गंभीर आरोप आणि राजकीय पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन तपास नंतर केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तसेच मोठी रक्कम देऊन सुपारी दिल्याचा आणि अनेक महिन्यांपासून हालचालींवर लक्ष ठेवण्यात आल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला होता. सन 2009 मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने पद्मसिंह पाटील यांना अटक केली होती. त्यानंतर या खटल्याची दीर्घकाळ सुनावणी सुरू राहिली. आता न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येतो, आरोपींचे भवितव्य काय ठरते आणि निंबाळकर कुटुंबाला न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. धाराशिवच्या राजकारणात एकेकाळी पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांची जोडी अतिशय प्रभावशाली मानली जात होती.

COMMENTS