देवळाली प्रवरा : राहुरी खुर्द येथे तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावरून ग्रामस्थांचा संताप अनावर झाला असून संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून जोरदार आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसांपासून गावात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत असल्याने महिलांनी ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली.“जोपर्यंत गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप उघडू देणार नाही,” असा इशारा आंदोलनकर्त्या महिलांनी दिला. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अनुपस्थित असल्याने महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच बहुतांश सदस्य उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.महिलांनी सांगितले की, “आम्ही नियमितपणे पाणीपट्टी भरत आहोत. मात्र तरीही पुरेसा व नियमित पाणीपुरवठा होत नाही. अनेकदा दोन-दोन दिवस नळाला पाणी येत नाही. पाण्यासाठी रात्रभर जागरण करावे लागत आहे.” त्यामुळे महिलांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान, ग्रामपंचायतीकडून “१४ गाव पाणीपुरवठा योजनेची टाकी पूर्ण क्षमतेने भरत नसल्यामुळे गावाला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे,” असे कारण सांगण्यात आले. मात्र ग्रामस्थांनी हे कारण फेटाळून लावत प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.आंदोलनावेळी १४ गाव पाणीपुरवठा योजना सदस्य शिवाजी शेंडे, शौकत इनामदार, ग्रामविकास अधिकारी प्रभाकर चव्हाण, आयुब पठाण तसेच ग्रामपंचायत सदस्य राम तोडमल, आश्विनी कुमावत, असफ पठाण आदी उपस्थित होते. यावेळी महिलांनी प्रशासनाला धारेवर धरत पाणीप्रश्न तात्काळ सोडविण्याची मागणी केली.या आंदोलनात जयश्री गाडे, मनीषा कारंजकर, स्वाती पवार, कविता पेंडभाजे, चंद्रकला खोजे, वैशाली क्षिरसागर, माया क्षिरसागर, शम्मू शेख, छाया मेहेत्रे, हेमा लालबागे, अर्पणा पवार, सुनंदा मोरे, मंगला कोरके, अनिता डोंगरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.तसेच निसारभाई शेख, पुंजा आघाव, लखन डोकडे, अन्सार पठाण, राजेंद्र खोजे, रफिक शेख, अशोक वाकचौरे, रंगनाथ चोपडे, संजय थोरात, जगन्नाथ भोसले, मनोहर गायकवाड, अनिल आढाव, राजेंद्र थोरात, योगेश गरड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल,असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

COMMENTS