Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

व्हीआयपी रोडवरील बेशिस्त पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?वाहतूक कोंडी करून सुद्धा गोदावरी हॉटेलला प्रशासनाचे पांघरूण?

नांदेड शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी महानगरपालिकेने अलीकडेच विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेत अनेक व्यावसायिकांवर कारवाई करण

भाजी मंडईत केंद्रेकर यांनी आखून दिलेली ‘लक्ष्मण रेषा’ कुचकामी ठरणार काय?जनता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रिजवान बागवान यांचा सवाल
मुंबईच्या आरे कॉलनीतील जुन्या दर्ग्यावर बीएमसीने चालवला हातोडा; वारिस पठाण यांचा प्रशासनावर गंभीर आरोप
अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव नको; सर्वांवर समान कारवाई करा-रतन गुजर



नांदेड शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी महानगरपालिकेने अलीकडेच विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेत अनेक व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली, तर रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, व्हीआयपी रोडवरील गोदावरी हॉटेलसमोरील वाहतूक कोंडी आणि रस्त्यावर होणारे पार्किंग याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संध्याकाळनंतर तसेच रात्री उशिरापर्यंत हॉटेलसमोर मोठ्या प्रमाणावर दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, इतर ठिकाणी तत्काळ कारवाई करणारे पोलीस आणि मनपा प्रशासन या ठिकाणी मात्र शांत भूमिका घेत असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही नागरिकांनी असा आरोप केला आहे की, संबंधित हॉटेलला प्रशासनातील काही घटकांचे विशेष सहकार्य मिळत असल्याने कोणतीही कठोर कारवाई केली जात नाही. त्यामुळे सर्वसामान्य व्यावसायिकांसाठी एक नियम आणि प्रभावशाली ठिकाणांसाठी दुसरा नियम का, असा सवालही उपस्थित होत आहे. दरम्यान, वाहतूक शाखा व महानगरपालिकेने या परिसराची पाहणी करून नियमबाह्य पार्किंगवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच व्हीआयपी रोडवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS