Homeताज्या बातम्याअहमदनगर

सोशल मीडियाच्या वादातून हल्ला

अहिल्यानगर : इन्स्टाग्रामवर सुरू असलेल्या वादाचे रूपांतर खूनी हल्ल्यात झाले. शहरातील नालेगाव भागात दोन सख्ख्या भावांवर चॉपर आणि चाकूने जीवघेणा हल

अल्पवयीन मुलास मारहाण  
सोनई पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात कारवाई  
जामखेडमध्ये आठ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्तस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; वाहनासह मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर : इन्स्टाग्रामवर सुरू असलेल्या वादाचे रूपांतर खूनी हल्ल्यात झाले. शहरातील नालेगाव भागात दोन सख्ख्या भावांवर चॉपर आणि चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये अभिषेक शाम टोणे आणि त्यांचा भाऊ कुबेर टोणे (दोघे रा. कवडे गल्ली, नालेगाव) गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी जखमी अभिषेक टोणे यांच्या फिर्यादीवरून रविवारी (10 मे) कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना 6 मे रोजी सायंकाळी 7:30 ते 8 वाजताच्या दरम्यान कवडे गल्ली, नालेगाव येथे अभिषेक व कुबेर यांच्या घरासमोर घडली आहे. सांगळे गल्ली येथील दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक जण अल्पवयीन आहे. 

COMMENTS