Homeताज्या बातम्याबीड

अंधविश्वासांना बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावामानसतज्ञ व समुपदेशक मनीषा बिक्कड- घुले यांचे प्रतिपादन

एकीकडे शिक्षण आणि विज्ञानाचे महत्त्व वाढत असताना दुसरीकडे अंधश्रद्धेचे पेव फुटत आहेत शिकलेली लोक देखील अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागत असून अनेक चुक

बीड जिल्ह्यात बेमुदत संपाचा दुसरा दिवस : शासकीय कार्यालयांत शुकशुकाटजुन्या पेन्शनसह प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी ठाम – आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
गुलाब देत पोलीस म्हणाले, जीव तुमचा आहे अन् नियमही तुमच्यासाठीचबीड पोलीसांनी फुलातून फुलवला वाहतुक शिस्तीचा संदेश
पुरुषोत्तमपुरी गोदापात्रात बुडणार्‍या भाविकास वाचवले; जवानांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार



एकीकडे शिक्षण आणि विज्ञानाचे महत्त्व वाढत असताना दुसरीकडे अंधश्रद्धेचे पेव फुटत आहेत शिकलेली लोक देखील अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागत असून अनेक चुकीच्या घटना घडताना दिसत आहेत. त्यामुळे आजच्या प्रत्येक महिलेने अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व पटवून दिले पाहिजे. अंध विश्वासाला बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, तसेच प्रत्येक महिलेने आपल्या भावना निर्भयपणे व्यक्त कराव्यात, असे प्रतिपादन बीड जिल्ह्यातील ख्यातनाम मानसतज्ञ तथा समुपदेशक मनीषा बिक्कड- घुले यांनी केले.
नाव्होली गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा सत्कार सोहळा गुरुवारी पार पडला. गावचे  सरपंच रणजीत बप्पा बिक्कड यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात  इंदुबाई रणजीत बिक्कड यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान आदर्श गाव निर्मितीसाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमात भारतरत्न पुरस्कार प्राप्त शाळा तसेच त्या शाळेतील शिक्षक व शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर पोलीस पाटील पदासाठी नियुक्ती झालेल्या छाया बिक्कड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. छाया  अंकुश बिक्कड/घुले यांनी यापूर्वी 11 महिने संबंधित शाळेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर उत्कृष्ट सेवा दिली होती. त्यांच्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीमुळे त्यांना या पदाची संधी मिळाल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच सेवानिवृत्त अंगणवाडी सेविकांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी मानसतज्ञ व समुपदेशक मनीषा नामदेव बिक्कड/घुले यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. मनिषा बिक्कड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व पटवून दिले. अंधविश्वासांना बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, तसेच प्रत्येक महिलेने आपल्या भावना निर्भयपणे व्यक्त कराव्यात, असे त्यांनी सांगितले. यासोबतच किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध असल्याने शाळांमध्ये विविध समुपदेशन कार्यक्रम राबवावेत, अशी विनंती त्यांनी केली. तसेच मानसिक आरोग्य जपण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

COMMENTS