Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिकच ‘गस्ती’वर ; ‘अलर्ट सिस्टीम’मुळे सुरक्षा वाढली; प्रवरा पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ

देवळाली प्रवरा : गेल्या दोन आठवड्यांपासून प्रवरा परिसरातील सोनगाव, सात्रळ आणि धानोरे या पंचक्रोशीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून सततच्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची गस्त अपुरी पडत असल्याने आता नागरिकांनीच स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी हाती घेत रात्री रस्त्यावर उतरून गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.   दरम्यान, ग्रामरक्षक दलाने तयार केलेली ‘अलर्ट सिस्टीम’ सध्या चोरट्यांविरोधातील प्रभावी शस्त्र ठरत आहे. चोरटे आल्याचा संशय निर्माण होताच गावकऱ्यांच्या मोबाईलवर अलर्ट संदेश पोहोचतो आणि काही क्षणांत संपूर्ण गाव ‘अलर्ट मोड’मध्ये जात आहे. सात्रळमध्ये १५ वेळा, सोनगावात १२ वेळा तर धानोरेमध्ये १५ वेळा अशा अलर्ट संदेशांनी नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.  संगमनेर, राहाता आणि राहुरी या तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेली ही गावे भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील मानली जातात. प्रवरा पट्ट्यातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या या भागाचा फायदा चोरटे घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र झाली आहे.  रात्रीच्या वेळी होणाऱ्या घरफोड्या, दारांवर दगड मारणे, दार वाजवणे तसेच संशयास्पद हालचालींमुळे विशेषतः महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांची गस्त केवळ नावापुरतीच असल्याने गावातील युवकांनी स्वतःची स्वतंत्र पथके तयार केली आहेत. हातात काठ्या आणि टॉर्च घेऊन युवक रात्रभर गावाची राखण करत आहेत.  “पोलिसांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता या पंचक्रोशीसाठी स्वतंत्र पोलिस स्टेशनची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासनाने तातडीने तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.  नागरिकांकडून ग्रामरक्षक दलाला माहिती मिळताच काही क्षणांतच शेजाऱ्यांचे मोबाईल वाजू लागतात आणि चोरट्यांची पळापळ सुरू होते. ग्रामस्थांच्या या जलद प्रतिसादामुळे चोरटे गोंधळून माघार घेत असल्याचे चित्र सध्या पंचक्रोशीत पाहायला मिळत आहे. पालकमंत्री विखेंकडे जाणार : ऍड. दिघे प्रवरा परिसरातील वाढत्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पाच स्वतंत्र पथके तयार करून रात्रभर गस्त घालावी, तसेच सोनगाव, सात्रळ आणि धानोरे पंचक्रोशीसाठी स्वतंत्र पोलिस स्टेशनची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांच्याकडे करणार असल्याचे प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे संचालक ऍड. आप्पासाहेब दिघे यांनी सांगितले. अलर्ट सिस्टीम ठरतेय  प्रभावी शस्त्र ग्रामरक्षक दलाने तयार केलेली ‘अलर्ट सिस्टीम’ सध्या चोरट्यांविरोधातील प्रभावी शस्त्र ठरत आहे. चोरटे आल्याचा संशय निर्माण होताच गावकऱ्यांच्या मोबाईलवर अलर्ट संदेश पोहोचतो आणि काही क्षणांत संपूर्ण गाव ‘अलर्ट मोड’मध्ये जात आहे. सात्रळमध्ये १५ वेळा, सोनगावात १२ वेळा तर धानोरेमध्ये १५ वेळा अशा अलर्ट संदेशांनी नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.

डॉ. आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचे दीपस्तंभ : माजी आ. काळे
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त कोपरगावात उत्साहात
ग्रामपंचायत पोट निवडणुकीत काळे गटाचे वर्चस्व

देवळाली प्रवरा : गेल्या दोन आठवड्यांपासून प्रवरा परिसरातील सोनगाव, सात्रळ आणि धानोरे या पंचक्रोशीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून सततच्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची गस्त अपुरी पडत असल्याने आता नागरिकांनीच स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी हाती घेत रात्री रस्त्यावर उतरून गस्त घालण्यास सुरुवात केली आहे.

  दरम्यान, ग्रामरक्षक दलाने तयार केलेली ‘अलर्ट सिस्टीम’ सध्या चोरट्यांविरोधातील प्रभावी शस्त्र ठरत आहे. चोरटे आल्याचा संशय निर्माण होताच गावकऱ्यांच्या मोबाईलवर अलर्ट संदेश पोहोचतो आणि काही क्षणांत संपूर्ण गाव ‘अलर्ट मोड’मध्ये जात आहे. सात्रळमध्ये १५ वेळा, सोनगावात १२ वेळा तर धानोरेमध्ये १५ वेळा अशा अलर्ट संदेशांनी नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.

 संगमनेर, राहाता आणि राहुरी या तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेली ही गावे भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील मानली जातात. प्रवरा पट्ट्यातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या या भागाचा फायदा चोरटे घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र झाली आहे.

 रात्रीच्या वेळी होणाऱ्या घरफोड्या, दारांवर दगड मारणे, दार वाजवणे तसेच संशयास्पद हालचालींमुळे विशेषतः महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांची गस्त केवळ नावापुरतीच असल्याने गावातील युवकांनी स्वतःची स्वतंत्र पथके तयार केली आहेत. हातात काठ्या आणि टॉर्च घेऊन युवक रात्रभर गावाची राखण करत आहेत.

 “पोलिसांना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता या पंचक्रोशीसाठी स्वतंत्र पोलिस स्टेशनची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासनाने तातडीने तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

 नागरिकांकडून ग्रामरक्षक दलाला माहिती मिळताच काही क्षणांतच शेजाऱ्यांचे मोबाईल वाजू लागतात आणि चोरट्यांची पळापळ सुरू होते. ग्रामस्थांच्या या जलद प्रतिसादामुळे चोरटे गोंधळून माघार घेत असल्याचे चित्र सध्या पंचक्रोशीत पाहायला मिळत आहे.

पालकमंत्री विखेंकडे जाणार : ऍड. दिघे

प्रवरा परिसरातील वाढत्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पाच स्वतंत्र पथके तयार करून रात्रभर गस्त घालावी, तसेच सोनगाव, सात्रळ आणि धानोरे पंचक्रोशीसाठी स्वतंत्र पोलिस स्टेशनची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांच्याकडे करणार असल्याचे प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे संचालक ऍड. आप्पासाहेब दिघे यांनी सांगितले.

अलर्ट सिस्टीम ठरतेय  प्रभावी शस्त्र

ग्रामरक्षक दलाने तयार केलेली ‘अलर्ट सिस्टीम’ सध्या चोरट्यांविरोधातील प्रभावी शस्त्र ठरत आहे. चोरटे आल्याचा संशय निर्माण होताच गावकऱ्यांच्या मोबाईलवर अलर्ट संदेश पोहोचतो आणि काही क्षणांत संपूर्ण गाव ‘अलर्ट मोड’मध्ये जात आहे. सात्रळमध्ये १५ वेळा, सोनगावात १२ वेळा तर धानोरेमध्ये १५ वेळा अशा अलर्ट संदेशांनी नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.

COMMENTS