Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिव्यांगांच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही आंदोलनाचा इशारा

मुंबई : शिवसेनेत प्रवेश करून अवघ्या काही दिवसांत विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर बच्चू कडू यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील दिव्यां

नांदेड जिल्ह्यातील जलसंधारणांची कामे तातडीने पूर्ण कराखा. डॅा. गोपछडे यांच्या उपस्थितीत बैठकीत मंत्री राठोड यांचे निर्देश
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र सरकारची मोठी पावले; कान्स दौरा रद्द करत इंधन आणि सरकारी खर्चात केली कपात!
मनमानी भाडेवाढ करणार्‍या खासगीबस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी अ‍ॅपवर कारवाई करा: मंत्री सरनाईक

मुंबई : शिवसेनेत प्रवेश करून अवघ्या काही दिवसांत विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर बच्चू कडू यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील दिव्यांग आणि नेत्रहीन नागरिकांना मिळणारे संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान गेल्या काही महिन्यांपासून थांबल्याच्या मुद्द्यावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट इशारा दिला आहे. सरकारने तातडीने या प्रश्‍नाची दखल घेतली नाही, तर मंत्रालयावर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात चाळीस टक्क्यांहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत दरमहा अडीच हजार रुपयांचे मानधन दिले जाते. मात्र फेब्रुवारीपासून अनेक दिव्यांगांना हे अनुदान मिळाले नसल्याची तक्रार समोर आली आहे. सलग तीन महिन्यांचे पैसे न मिळाल्यामुळे हजारो कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे. विशेषतः नेत्रहीन नागरिकांना रोजच्या गरजा भागवताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर नागपूर विभागातील विविध जिल्ह्यांतील नेत्रहीन नागरिकांनी मुख्यमंत्री सचिवालयात जाऊन आपली व्यथा मांडली. घरभाडे, वीजबिल, औषधोपचार आणि दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले. अनेक नेत्रहीन नागरिक रेल्वे स्थानके, बसस्थानके आणि सार्वजनिक ठिकाणी लहानसहान वस्तू विकून उदरनिर्वाह करतात. शासनाच्या मदतीवर त्यांचे जीवन अवलंबून असताना तीच मदत रखडल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली. नेत्रहीन नागरिकांना मुख्यमंत्री कार्यालयावर मोर्चा काढावा लागणे ही वेदनादायक बाब असल्याचे त्यांनी म्हटले. या विषयावर आपण उपमुख्यमंत्री आणि संबंधित अधिकार्‍यांशी सातत्याने चर्चा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. शासनाच्या काही निर्णयांमुळे अनेक दिव्यांग लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेषतः ओळखपत्र मिळेपर्यंत मानधन रोखण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. काही शासन निर्णयांमुळे जवळपास निम्म्या दिव्यांग लाभार्थ्यांना योजनांचा फायदा मिळत नसल्याचेही त्यांनी नमूद केले. तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार फेर्‍या मारूनही अधिकार्‍यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार आंदोलकांनी केली. सरकारकडे इतर योजनांसाठी निधी उपलब्ध असताना दिव्यांगांच्या हक्काच्या मदतीसाठी निधी का दिला जात नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आला.


19 मे रोजी मंत्रालयात आंदोलन करण्याचा इशारा
सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही, तर 19 मे रोजी तारखेला मंत्रालयात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे. सत्ताधारी गटात सहभागी झाल्यानंतरही त्यांनी दिव्यांगांच्या प्रश्‍नावर घेतलेली आक्रमक भूमिका आता राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.

COMMENTS