Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : नाशिकमधील बहुचर्चित प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोपावरून एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल पुन्हा एकदा वादात

 चाकू हल्ल्यात तरुण गंभीर जखमी
अल्पवयीन मुलास मारहाण  
दारूच्या नशेत पोलिसांना खोटा कॉल; मद्यपीविरुद्ध गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : नाशिकमधील बहुचर्चित प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोपावरून एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सोशल मीडियावर त्यांची एक कथित आक्षेपार्ह चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर शहरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. संबंधित चित्रफितीत एका तरुणीसोबत व्हिडिओ संवाद करताना आक्षेपार्ह हालचाली करण्यास सांगितल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या चित्रफितीची अधिकृत सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही.

नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत निदा खान हिला ताब्यात घेतले होते. ती नारेगाव परिसरातील एका घरात वास्तव्यास असल्याचे समोर आले. संबंधित घर मतीन पटेल यांनी काही महिन्यांपूर्वी विकत घेतल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्यांचा मोबाईल संचही जप्त केला आहे.

काही सामाजिक संघटनांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच मतीन पटेल यांना पदावरून हटवण्याची मागणीही जोर धरत आहे. मतीन पटेल हे एमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचे निकटवर्तीय मानले जातात. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

COMMENTS