कोपरगाव: कोपरगाव मतदारसंघात शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' विविध ठिकाणी संपन्न होणार आहे. नागरिकां

कोपरगाव: कोपरगाव मतदारसंघात शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ विविध ठिकाणी संपन्न होणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन महसुली अडचणी तात्काळ सोडवण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
यासाठी ११ मे रोजी सकाळी ९ वाजता हनुमान मंदिराजवळील सभागृह, दहेगाव बोलका, तर सकाळी १० वाजता पोहेगाव येथील वक्रतुंड मंगल कार्यालय येथे हे शिबिर होईल. तसेच १५ मे रोजी कोपरगाव शहरातील कलश मंगल कार्यालय येथे हे अभियान संपन्न होणार आहे.
या अभियानात सातबारा उतारा, फेरफार नोंदी, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, वारस नोंद, जमीन मोजणी, ई-पीक पाहणी आणि नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई संदर्भातील प्रश्नांवर तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करतील, तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार विवेकभैय्या कोल्हे आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS