बीड : भारत सरकारच्या 16 व्या राष्ट्रीय जनगणना 2027 अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्व-जनगणना या डिजिटल उपक्रमाला बीड तालुक्यात नागरिकांकडून चांगला

बीड : भारत सरकारच्या 16 व्या राष्ट्रीय जनगणना 2027 अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्व-जनगणना या डिजिटल उपक्रमाला बीड तालुक्यात नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने स्वतःची आणि कुटुंबाची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या प्रक्रियेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा प्रशासनाने या उपक्रमासाठी व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. ग्रामीण व शहरी भागात विविध माध्यमांद्वारे नागरिकांना डिजिटल जनगणनेबाबत माहिती दिली जात आहे. यंदाच्या जनगणनेत प्रथमच स्व-जनगणना ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात राबविण्यात येत आहे. नागरिकांना स्वतःहून आपली माहिती ऑनलाइन भरता येणार असून ही प्रक्रिया पारदर्शक, जलद आणि अचूक असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. महाराष्ट्रासाठी 1 मे ते 15 मे 2026 हा कालावधी स्व-जनगणनेसाठी निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान सरकारी प्रगणक घरोघरी जाऊन माहितीची पडताळणी करणार आहेत. अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांनी सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात जनजागृती मोहिमेला गती देण्यात आली असून ग्रामस्तरावर विशेष बैठका घेतल्या जात आहेत. तहसील कार्यालय बीडमार्फत ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. या सर्वांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवली जात आहे. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनीही नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून अचूक माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगितले. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी स्पष्ट केले की, जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजणी नसून भविष्यातील विकास धोरणांचा पाया आहे. त्यांनी सांगितले, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, रोजगार, निवास, अन्नसुरक्षा आणि सामाजिक योजनांचे नियोजन हे जनगणनेतील आकडेवारीवर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.स्व-जनगणना ही आधुनिक, पारदर्शक आणि वेळ वाचवणारी प्रक्रिया असून यामुळे भविष्यातील प्रशासन अधिक डेटा-आधारित आणि परिणामकारक होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बीड तालुक्यात या उपक्रमाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता डिजिटल जनगणना मोहिम यशस्वी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
स्व-जनगणना प्रक्रिया कशी करायची?
नागरिकांनी हीींिीं://ीश.लशर्पीीी.र्सेीं.ळप या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल. कुटुंब प्रमुखाचा मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी द्वारे लॉगिन, राज्य निवड(महाराष्ट्र), भाषा निवड (नंतर बदलता येणार नाही), घराचा पत्ता व लोकेशन मार्किंग कुटुंबातील सदस्यांची माहिती, घरगुती सुविधा, शिक्षण, रोजगार, स्थलांतर इत्यादी 33 प्रश्न, अंतिम सबमिट केल्यानंतर डए खऊ तयार होईल, ही डए खऊ नंतर प्रगणकांना दाखवून पडताळणी पूर्ण केली जाईल.
डिजिटल जनगणनेतील महत्त्वाचे मुद्दे
एका मोबाईल नंबरवरून फक्त एकच घर नोंदवता येणार, माहिती एकदा सबमिट केल्यानंतर बदल करता येणार नाही, ओटीपी कोणालाही देऊ नये, प्रगणकाला फक्त डए खऊ दाखवायचा आहे, बनावट लिंक आणि कॉलपासून सावध राहावे
फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
प्रशासनाने नागरिकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की जनगणनेच्या नावाने येणार्या कोणत्याही अनधिकृत लिंक, कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नये. फक्त अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा आणि ओटीपी, बँक माहिती किंवा वैयक्तिक तपशील कोणालाही देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशिक्षण आणि मदत केंद्रे
तालुकास्तरावर अधिकारी व कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आपले सरकार सेवा केंद्रांवर विशेष सहाय्य कक्ष सुरू करण्यात आले आहेत. युवक, शिक्षक, ग्रामसेवक आणि स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने गावपातळीवर जनजागृती मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जात आहे.

COMMENTS