Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुलसी कनिष्ठ महाविद्यालयाचा 97.14% निकाल; तिन्ही शाखांत यशाची परंपरा कायम

बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाही

शरद पवारांच्या योगदानामुळे रयत शिक्षण संस्थेची उंची वाढली
अभिनंदन! साक्षी शिवाजी भोसकर यांचे 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश
स्वारातीम विद्यापीठाच्या औषधनिर्माणशास्त्र संकुलाचे राष्ट्रीय परीक्षेत घवघवीत यश29 विद्यार्थी जी-पॅट / गेट 2026 मध्ये पात्र
Tulsi College Of Computer Science & Information Technology in Adarsh Nagar, Beed - Best BCA Colleges near me in Beed - Justdial

बीड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत बीड येथील तुलसी कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
महाविद्यालयाचा एकूण निकाल 92.53% लागला असून, विज्ञान शाखेने 97.14% निकालासह घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच कला शाखेचा निकाल 80.00% आणि वाणिज्य शाखेचा 66.66% लागला असून, तिन्ही शाखांमधील विद्यार्थ्यांमध्ये गुणांची मोठी चुरस पाहायला मिळाली. यामध्ये विज्ञान शाखेत आर्यन कोरडे याने प्रथम क्रमांक पटकावला, तर सम्यक इनकर व प्राची पगारे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. वाणिज्य शाखेतून साक्षी गायकवाड आणि कला शाखेतून मयुरी नावाडकर यांनी महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला.  विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रकाश ढोकणे, तसेच प्रा. सीमा पवार, प्रा. प्रकाश गायकवाड, प्रा. हनुमंत विद्यागर, प्रा. निलेश जाधव, प्रा. गणेश काळे आणि श्री. महेश उड्डाण यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS