Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्हा शिवसेनेची कार्यकारणी बरखास्त मंत्री उदय सामंत यांची कार्यवाही ; प्रभारी म्हणून जिल्हाप्रमुखांकडे जबाबदारी 

कोपरगाव शहर : उद्योगमंत्री तथा शिवसेना पक्षाचे अहिल्यानगर जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर शिर्डी राहुरी नेवासा व श्रीरामपूर येथे शिवसेना आढावा बैठक पार पडली. बैठकीदरम्यान त्यांनी तालुका व जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यात त्यांना कामकाजाबाबत अनेक त्रुटी आढळून आल्या. पक्ष संघटना वाढवण्यासाठी कार्यकारणीवर असलेले पदाधिकाऱ्यांनी कुचराईपणा व बेबनाव केला व सातत्याने तक्रारी वाढल्याने त्यांनी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेनेची सर्व अंगीकृत संघटनेसह कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्याची घोषणा केली; मात्र नवीन कार्यकारिणी निवड होई पर्यंत प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून नितीनराव औताडे, कमलाकर कोते, बाबुशेठ टायरवाले व अनिल शिंदे यांच्यावर जबाबदारी कायम ठेवली आहे. आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी नव्या जोमाने व ताकदीने काम करण्याच्या सूचना उदय सामंत यांनी शिवसैनिकांना दिल्या.  त्यांनी जिल्ह्यातील युवासेना, शिवसेना, महिला आघाडी , शेअर व ग्रामीण सर्व अंगीकृत  कार्यकारिणी बरखास्त करण्याचे निर्देश दिले. लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस आ. अमोल खताळ, माजी खा. सदाशिव लोखंडे, माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, शिवसेना नेते सागर बेग, जिल्हाध्यक्ष नितीन औताडे, प्रवक्ता संजीव भोर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसच्या नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी किरण पाटील
महात्मा गांधी विद्यालयाचे चौघे राज्यात प्रथम; बारावीतील नऊ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांहून अधिक गुण
खरातला आज न्यायालयात करणार हजर; महिलांना गर्भधारणा टाळण्यासाठी औषधांचा वापर केल्याचा संशय

कोपरगाव शहर : उद्योगमंत्री तथा शिवसेना पक्षाचे अहिल्यानगर जिल्हा संपर्क मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर शिर्डी राहुरी नेवासा व श्रीरामपूर येथे शिवसेना आढावा बैठक पार पडली. बैठकीदरम्यान त्यांनी तालुका व जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यात त्यांना कामकाजाबाबत अनेक त्रुटी आढळून आल्या. पक्ष संघटना वाढवण्यासाठी कार्यकारणीवर असलेले पदाधिकाऱ्यांनी कुचराईपणा व बेबनाव केला व सातत्याने तक्रारी वाढल्याने त्यांनी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेनेची सर्व अंगीकृत संघटनेसह कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्याची घोषणा केली; मात्र नवीन कार्यकारिणी निवड होई पर्यंत प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून नितीनराव औताडे, कमलाकर कोते, बाबुशेठ टायरवाले व अनिल शिंदे यांच्यावर जबाबदारी कायम ठेवली आहे.

आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी नव्या जोमाने व ताकदीने काम करण्याच्या सूचना उदय सामंत यांनी शिवसैनिकांना दिल्या.  त्यांनी जिल्ह्यातील युवासेना, शिवसेना, महिला आघाडी , शेअर व ग्रामीण सर्व अंगीकृत  कार्यकारिणी बरखास्त करण्याचे निर्देश दिले. लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस आ. अमोल खताळ, माजी खा. सदाशिव लोखंडे, माजी आ. भानुदास मुरकुटे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, शिवसेना नेते सागर बेग, जिल्हाध्यक्ष नितीन औताडे, प्रवक्ता संजीव भोर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS