Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांनी घेतली सद्भावना दिवस शपथ 

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेत देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवस शपथ घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कर्मवीर र

शेतकरी संघटनांच्यावतीने पुकारण्यात आलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्षाने पाठिंबा देताना पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने केली व ही दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.
 धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव चोरी गेल्याची बुलढाणा पोलिसात तक्रार दाखल
चकलांब्यात विजेचा लपंडाव; पुरवठा सुरळीतपणे करण्याची मागणी

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेत देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवस शपथ घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या हस्ते देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता, सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य राखण्यासाठी प्रत्येकवर्षी देशाचे दिवंगत माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सद्भावना दिवस शपथ ही घेतली जाते. नाशिक जिल्हा परिषदेत देखील सद्भावना दिवसानिमित्त अधिकारी व कर्मचारी यांना शपथ देण्यात आली. शिक्षण विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सद्भावना दिवस शपथ दिली, यावेळी सहायक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, वृषाली पाठक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी गणेश बगड, अनिल गिते, भूषण भार्गवे, नितीन पवार, शिवराम बोटे, चंद्रशेखर पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS