Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगराध्यक्ष रोहिणी घुलेंच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

कर्जत : कर्जत नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांच्या विरोधात १३ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. नगराध्यक्षांना पदावरून हटविण्याची मागणी या प्रस्तावातून करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावावर गटनेते प्रा. सतीश उद्धवराव पाटील, सुवर्णा रवींद्र सुपेकर, उषा अक्षय राऊत, प्रतिभा नंदकिशोर भैलुमे, लंकाबाई देविदास खरात, छाया सुनील शेलार, अश्विनी गजानन दळवी, ताराबाई सुरेश कुलथे, मोनाली ओंकार तोटे, मोहनी दत्तात्रय पिसाळ, नामदेव चंद्रकांत राऊत, अमृत श्रीधर काळदाते आणि ज्योती लालासाहेब शेळके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अविश्वास प्रस्तावात नगराध्यक्ष रोहिणी घुले या नगरपंचायतीचे कामकाज करताना कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासन नियमांचे पालन न करता मनमानी पद्धतीने कारभार केला जात असल्याचे नगरसेवकांनी म्हटले आहे. तसेच प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याबाबत मागणी करूनही नगराध्यक्ष नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोग्य, दिवाबत्ती, शिक्षण, सांडपाणी विल्हेवाट यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांच्या विविध समस्या प्रलंबित राहत असून नगरपंचायतीचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला असल्याचे संबंधित नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे.

बारामती, राहुरीत प्रचाराची सांगता; अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी : सुनेत्रा पवार
‘विश्वकोश ज्ञानवर्धन’ स्पर्धेत ‘आत्मा मालिक’चा दबदबा
‘कृष्णप्रिया’ संस्थेचे बाल सुसंस्कार शिबीर उत्साहात
Karjat | कर्जतच्या नगराध्यक्षपदी प्रा. राम शिंदे गटाच्या रोहिणी घुले  बिनविरोध | I Love Nagar | News Portal

कर्जत : कर्जत नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्ष रोहिणी सचिन घुले यांच्या विरोधात १३ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. नगराध्यक्षांना पदावरून हटविण्याची मागणी या प्रस्तावातून करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावावर गटनेते प्रा. सतीश उद्धवराव पाटील, सुवर्णा रवींद्र सुपेकर, उषा अक्षय राऊत, प्रतिभा नंदकिशोर भैलुमे, लंकाबाई देविदास खरात, छाया सुनील शेलार, अश्विनी गजानन दळवी, ताराबाई सुरेश कुलथे, मोनाली ओंकार तोटे, मोहनी दत्तात्रय पिसाळ, नामदेव चंद्रकांत राऊत, अमृत श्रीधर काळदाते आणि ज्योती लालासाहेब शेळके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अविश्वास प्रस्तावात नगराध्यक्ष रोहिणी घुले या नगरपंचायतीचे कामकाज करताना कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासन नियमांचे पालन न करता मनमानी पद्धतीने कारभार केला जात असल्याचे नगरसेवकांनी म्हटले आहे.

तसेच प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याबाबत मागणी करूनही नगराध्यक्ष नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोग्य, दिवाबत्ती, शिक्षण, सांडपाणी विल्हेवाट यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत वेळोवेळी मागणी करूनही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

नागरिकांच्या विविध समस्या प्रलंबित राहत असून नगरपंचायतीचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत नगराध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला असल्याचे संबंधित नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS