Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिद्द मेहनत चिकाटी यावर सातत्य ठेवले तर यश संपादित करता येते-दत्ता वाकसे

बीड : सिरसाळा येथील भूमिपूत्र असलेले पांडुरंग त्रिंबक काळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस खात्याअंतर्गत घेतल्या जाणार्‍या परीक्षेतून पो

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा नव्या जलक्रांतीची दिशा; आ. आशुतोष काळे; कुंभारी येथे गोदावरीचे जलपूजन
जिद्द मेहनत चिकाटी यावर सातत्य ठेवले तर यश संपादित करता येते-दत्ता वाकसे
चोंडीच्या विकासातून पर्यटनाला चालना मिळणार : मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्‍वास; श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक उत्साहात

बीड : सिरसाळा येथील भूमिपूत्र असलेले पांडुरंग त्रिंबक काळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस खात्याअंतर्गत घेतल्या जाणार्‍या परीक्षेतून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल मल्हार ब्रिगेडच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला  आहे. पांडूरंग काळे हे मुंबई पोलीस दलात कर्मचारी सेवा बजावतात. 15 वर्षे पोलीस खात्यात त्यांनी सेवा बजावली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परिक्षेत उत्तीर्ण झाले. आणि उपपोलिसनिरीक्षक पोलीस अधिकारी झाले असल्याने मल्हार ब्रिगेडच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत केले. पांडूरंग काळे, याचे प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षण सिरसाळ्यासारख्या ग्रामीण भागातच झाले. परंतु जिद्द आणि स्वप्न खुप मोठे होते. वयाच्या 19/20 वर्षात ते पोलीस भरती मध्ये यशस्वी झाले. ते एवढ्यावरच न थांबता पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले आणि सतत मेहनत करत अभ्यासात सातत्य ठेवत प्रयत्न केले त्यांच्या यशाबद्दल मल्हार ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता वाकसे यांनी सिरसाळा येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन बारा ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करणार्‍या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा पिवळशाल हार देऊन भव्य स्वागत केले यावेळी बोलताना वाकसे म्हणाले की जिद्द मेहनत चिकाटी यावर सातत्य ठेवले तर यश संपादित करता येते त्यामुळे कायम मेहनत आणि जिद्द मनामध्ये ठेवून ध्येय निश्चित केले पाहिजे आणि त्या ध्येयाच्या यशाकडे जाण्यासाठी संघर्ष फार महत्त्वाचा असून संघर्ष केल्यानंतरच यशाचा टप्पा गाठता येतो त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांनी स्वतःच्या मनाशी बाळगलेले स्वप्न साकार करण्यासाठी जिद्द चिकाटी आणि मेहनत कायम ठेवली पाहिजे असे देखील सत्काराच्या प्रसंगी मल्हार ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष दत्ता वाकसे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)पक्षाचे युवकचे परळी तालुकाध्यक्ष मुन्ना काळे, पत्रकार अविनाश मुजमूले, नितीन कोठुळे, डॉ उजगरे, आदी उपस्थित होते

COMMENTS