Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

उत्तरप्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यात अपघातातील जखमींना मदत करणार्‍यांनाच चिरडले, 8 जणांचा मृत्यू

आंबेडकरनगर : उत्तरप्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यातील जलालपूर येथे रविवारी मध्यरात्री अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला. आधी झालेल्या एका अपघातातील जखमी

गाझीपूरमध्ये ५० प्रवाशांनी भरलेली बस ३० फूट खोल पाण्यात कोसळली; १ जणाचा मृत्यू, २४ जण गंभीर जखमी
उत्तरप्रदेशातील अपघातात 11 जणांचा होरपळून मृत्यू
लखीमपुर खिरीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेवरून वाद; संतप्त जमावाकडून पोलीस गाडीची तोडफोड

आंबेडकरनगर : उत्तरप्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यातील जलालपूर येथे रविवारी मध्यरात्री अत्यंत हृदयद्रावक अपघात घडला. आधी झालेल्या एका अपघातातील जखमींना मदत करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवरच भरधाव वेगाने आलेल्या एका अनियंत्रित चारचाकी वाहनाने धडक दिली. या भीषण घटनेत आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास जलालपूर परिसरात एक अपघात झाला होता. त्या घटनेतील जखमींना मदत करण्यासाठी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. याच वेळी अचानक वेगाने आलेल्या वाहनाने नियंत्रण सुटल्याने थेट या नागरिकांच्या गर्दीत घुसून त्यांना चिरडले.

COMMENTS