Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“गाड्या फेकून द्या” म्हणणाऱ्या आदिती तटकरेंवर सुषमा अंधारे यांची जोरदार टीका

https://www.youtube.com/watch?v=ei9yMMRzhn0 राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आल्या आहेत. व

ठाणे महापालिकेचे उपायुक्त निलंबित
आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना ठाणे कारागृहात १७८ व्या शहीद दिनी मानवंदना
माळशेज घाटात अहिल्यानगर एसटीचा आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक; ४ जणांचा जागीच मृत्यू, दोन मुलांसह ४ गंभीर जखमी!

राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आल्या आहेत. वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर त्यांचा पारा इतका चढला की त्यांनी थेट “गाड्या फेकून द्या” असे विधान केले. आता याच विधानावरून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी तटकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.

प्रकरण आहे वाहतूक कोंडीचं. मंत्री आदिती तटकरे या प्रवासात असताना मोठ्या ट्रॅफिकमध्ये अडकल्या. बराच वेळ गाडी पुढे सरकत नसल्याने मंत्र्यांचा संयम सुटला. संतापलेल्या आदिती तटकरेंनी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना उद्देशून “या गाड्या फेकून द्या” असे विधान केले. मंत्र्यांच्या या रागाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि वादाला तोंड फुटले.

मंत्री महोदयांच्या या वागण्यावर सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली आहे. अंधारे म्हणाल्या की, “सत्ता डोक्यात गेली की सामान्यांच्या अडचणींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. गाड्या फेकून द्या म्हणण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा सुधारण्यावर भर दिला असता तर जनतेलाही दिलासा मिळाला असता.” आदिती तटकरेंचे हे विधान उद्धटपणाचे लक्षण असल्याची टीका आता होत आहे.

COMMENTS