नांदेड : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माणुसकी पोहोचविण्याचे काम म्हणजे खर्या अर्थाने राष्ट्रसेवा होय. धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी वर्षभरात

नांदेड : समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माणुसकी पोहोचविण्याचे काम म्हणजे खर्या अर्थाने राष्ट्रसेवा होय. धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांनी वर्षभरात 90 उपक्रम राबवून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. ‘भाऊचा माणुसकीचा फ्रिज’ हा केवळ उपक्रम नसून तो मानवतेचा जिवंत संदेश आहे. असे उपक्रम महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात राबविले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुनील राणे यांनी केले.
नांदेड जिल्ह्याच्या आढावा बैठकीनिमित्त सुनील राणे हे शहरात आले होते. प्रदेश उपाध्यक्ष ड. चैतन्यबापू देशमुख यांनी त्यांना ड. दिलीप ठाकूर यांच्या विविध सामाजिक कार्याची सविस्तर माहिती दिली. समाजासाठी सातत्याने झटणार्या या कार्याची दखल घेत त्यांनी स्वतःहून ‘भाऊचा माणुसकीचा फ्रिज’ या उपक्रमाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली.रविवारी सकाळी महावीर चौक येथील पंचवटी हनुमान मंदिर परिसरात असलेल्या या फ्रिजला त्यांनी भेट दिली. यावेळी भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर उपस्थित होते. प्रारंभी ड. दिलीप ठाकूर यांनी शाल, मोत्यांची माळ व नॅपकिन चा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचा सन्मान केला. उपक्रमाची माहिती देताना दिलीप ठाकूर यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांपासून हा फ्रिज अखंडित सुरू असून दररोज 40 ते 120 जेवणाचे डबे येथे ठेवले जातात. कोणतीही अट न ठेवता, कोणताही भेदभाव न करता गरजू नागरिक हे डबे विनामूल्य घेऊन जातात. शहरात कोणीही उपाशी राहू नये आणि अन्न वाया जाऊ नये, या उदात्त हेतूने कोरोना काळात या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.भूक ही सर्वात मोठी वेदना आहे आणि त्या वेदनेवर अन्न हेच औषध आहे, या भावनेतून हा फ्रिज उभा राहिला. दिवाळीच्या काळात सुमारे एक क्विंटल मिठाई येथे ठेवली जाते, ज्यामुळे अनेक गरजू कुटुंबांच्या घरात सणाचा आनंद पोहोचतो. याशिवाय जे चालू वर्ष असेल तितक्या संख्येत हिवाळ्यात ब्लँकेट, पावसाळ्यात छत्र्या आणि उन्हाळ्यात चपला यांचे मोफत वाटप करून गरजूंच्या जीवनात आधार निर्माण केला जातो. मागील 74 महिन्यांपासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी मानसिकदृष्ट्या आजारी व निराधार व्यक्तींचे केस कापणे, दाढी करणे, स्वच्छ स्नान घालणे आणि त्यांना नवीन कपडे देणे असा कायापालट उपक्रम सातत्याने राबविला जात आहे.तसेच वर्षातील 365 दिवस सुरू असलेल्या तीन प्रमुख उपक्रमांमध्ये भुकेल्यांसाठी ‘भाऊचा माणुसकीचा फ्रिज’, रुग्णांसाठी ‘भाऊचा डबा’ आणि एचआयव्ही रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात दररोज बिस्किटांचे वाटप करणारा ‘क्षुधा शांती ‘ यांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे हजारो गरजूंना आधार मिळत असून समाजात मानवतेचा जिवंत संदेश पोहोचत आहे. हे सर्व उपक्रम खा. अशोकराव चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे व ड. चैतन्य देशमुख, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, महानगराध्यक्ष अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ड. किशोर देशमुख, महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, स्थायी सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, सभागृह नेते ड. महेश कनकदंडे तसेच लायन्स उपप्रांतपाल योगेश जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. यानंतर सुनील राणे व अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते गरजूंना जेवणाचे डबे वाटप करण्यात आले. या प्रसंगी अनेक गरजूंनी समाधान व्यक्त केले, तर उपस्थितांमध्ये सेवाभाव, सहकार्य आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण झाली.माणुसकी जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येकाने थोडासा हातभार लावणे आवश्यक आहे, या भावनेतून आपल्या प्रियजनांच्या वाढदिवसानिमित्त अथवा स्मृतिप्रित्यर्थ किमान 40 जेवणाचे डबे देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे भावनिक आवाहन संयोजक धर्मभूषण ड. दिलीप ठाकूर यांनी केले आहे. या उपक्रमाच्या यशामागे नांदेड शहरातील दानशूर नागरिक तसेचप्रभुदास वाडेकर, महेंद्र शिंदे व विजय वाडेकर यांचे सातत्यपूर्ण व निःस्वार्थी परिश्रम मोलाचे ठरत आहेत. त्यांच्या समर्पणामुळेच हा उपक्रम आज हजारो गरजूंना आधार देणारा ठरला आहे.समाजातील प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून अशा उपक्रमात सहभागी झाले, तर कोणीही उपाशी राहणार नाही हे स्वप्न केवळ स्वप्न न राहता वास्तवात उतरेल, असा ठाम विश्वास यावेळी सुनील राणे यांच्या तर्फे व्यक्त करण्यात आला.

COMMENTS