Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाथर्डी जैन समाजाच्या वतीने मधुरा भंडारींचे स्वागत

पाथर्डी :  संगमनेर येथील जैन समाजातील मधुरा महेश भंडारी हिच्या दीक्षा महोस्तवसाठी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने आयोजित स्वागतासाठी पाथर्डी शहरातील जैन बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.  या स्वागत सोहळ्याची सुरुवात सकाळी वामनभाऊ नगर येथून मोटरसायकल फेरीने करण्यात आली ही फेरीचा शेवट शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत जैन स्थानक येथे करण्यात आला.  यावेळी जैन स्थानक येथे दीक्षार्थी मधुरा भंडारी यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले. यानंतर जैन साधूंच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला.या सोहळ्यासाठी दीक्षार्थी मधुरा भंडारी यांच्यासह त्यांचे वडील महेश भंडारी व आई आरती भंडारी उपस्थित होते.  या स्वागत कार्यक्रमासाठी राजेंद्र भंडारी,सचिन भंडारी,निलेश बोरा,अनिल खाटेर,सचिन चोरडिया,पंकज मुनोत,चंदन कुचेरिया,प्रितश पटवा,महेंद्र गुगळे,अक्षय नहार,श्रेयस चोरडिया,साहिल लुणावत,अल्पेश भंडारी, धीरज गुंदेचा,आनंद गुगळे,पारस कर्नावट,अजिंक्य कांकरिया आदीनी परिश्रम घेतले.   दुपारी सुनंदजी महाराज,डॉ.प्रणवदर्शना महाराज यांचे व्याख्यान होऊन दीक्षार्थीं मधुरा हिला संयमाच्या मार्गावर आणि धर्माचे कार्य करण्याचे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुरेश गुगळे,स्वागत सुभाष चोरडिया यांनी करून आनंदकुमार चोरडिया यांनी आभार मानले.  या दीक्षा महोत्सवाची सुरवात आज झाली असून येणाऱ्या १० तारखेपर्यत विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जाणार असून मुख्य दीक्षा सोहळा ११ मे रोजी होणार आहे. 

ऋषिकेश सोनटक्के यांची कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञपदी निवड
शेवगावमध्ये महिलांना चाकूच्या धाकावर लुटण्याचे प्रयत्न; कारवाईची मागणी; नागरिकांचे पोलिसांना निवेदन
प्रकल्प स्पर्धेतून विद्यार्थ्यांना नवसंशोधनाची संधी : उपसचिव देवेंद्र दंडगव्हाळ

पाथर्डी :  संगमनेर येथील जैन समाजातील मधुरा महेश भंडारी हिच्या दीक्षा महोस्तवसाठी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने आयोजित स्वागतासाठी पाथर्डी शहरातील जैन बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

 या स्वागत सोहळ्याची सुरुवात सकाळी वामनभाऊ नगर येथून मोटरसायकल फेरीने करण्यात आली ही फेरीचा शेवट शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत जैन स्थानक येथे करण्यात आला.  यावेळी जैन स्थानक येथे दीक्षार्थी मधुरा भंडारी यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले. यानंतर जैन साधूंच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला.या सोहळ्यासाठी दीक्षार्थी मधुरा भंडारी यांच्यासह त्यांचे वडील महेश भंडारी व आई आरती भंडारी उपस्थित होते.

 या स्वागत कार्यक्रमासाठी राजेंद्र भंडारी,सचिन भंडारी,निलेश बोरा,अनिल खाटेर,सचिन चोरडिया,पंकज मुनोत,चंदन कुचेरिया,प्रितश पटवा,महेंद्र गुगळे,अक्षय नहार,श्रेयस चोरडिया,साहिल लुणावत,अल्पेश भंडारी, धीरज गुंदेचा,आनंद गुगळे,पारस कर्नावट,अजिंक्य कांकरिया आदीनी परिश्रम घेतले.

  दुपारी सुनंदजी महाराज,डॉ.प्रणवदर्शना महाराज यांचे व्याख्यान होऊन दीक्षार्थीं मधुरा हिला संयमाच्या मार्गावर आणि धर्माचे कार्य करण्याचे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुरेश गुगळे,स्वागत सुभाष चोरडिया यांनी करून आनंदकुमार चोरडिया यांनी आभार मानले.

 या दीक्षा महोत्सवाची सुरवात आज झाली असून येणाऱ्या १० तारखेपर्यत विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जाणार असून मुख्य दीक्षा सोहळा ११ मे रोजी होणार आहे. 

COMMENTS