Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी प्रसून जोशी यांची नियुक्ती

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सुप्रसिद्ध गीतकार, लेखक आणि संवाद क्षेत्रातील तज्ज्ञ प्रसून जोशी यांची प्रसार भारती या देशातील प्रमुख सार्वजनिक प्रसा

पेट्रोल-डिझेल उपलब्ध करा; खा.बजरंग सोनवणे यांचे केंद्रीय मंत्र्यांना पत्र; जिल्ह्यातील परिस्थतीबाबत दिली पत्रातून सविस्तर माहिती
नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पाला कर्नाटक सरकारचा नकार; खा.चव्हाणांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
विशेष अधिवेशन : महिला आरक्षणाच्या नावाखाली परिसीमन !

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सुप्रसिद्ध गीतकार, लेखक आणि संवाद क्षेत्रातील तज्ज्ञ प्रसून जोशी यांची प्रसार भारती या देशातील प्रमुख सार्वजनिक प्रसारण संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अधिकृत निवेदनाद्वारे ही घोषणा केली. याआधी या पदावर कार्यरत असलेले नवनीत सहगल यांनी चार डिसेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.
केंद्रीय मंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी प्रसून जोशी यांच्या नियुक्तीचे स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, जोशी यांनी साहित्य, जाहिरात आणि चित्रपट या क्षेत्रांत भरीव कामगिरी केली असून त्यांच्या सर्जनशीलतेमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली आहे. त्यांच्या लेखनात भारतीय संस्कृतीची छाप स्पष्टपणे दिसून येते आणि त्यांच्या विचारांतून देशाच्या परंपरा व मूल्यांचे प्रतिबिंब उमटते. त्यांच्या नेतृत्वामुळे प्रसार भारतीला नवी दिशा, नवचैतन्य आणि सर्जनशील दृष्टी मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. प्रसून जोशी यांनी यापूर्वी केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे.

COMMENTS