Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आहात तसाच जीवनाचा स्विकार करा आपोआपच जीवन बदलेल-अ‍ॅड.श्रीकांत माळकरमहिला आत्मभान प्रशिक्षण शिबीराचे उध्दघाटन

अंबाजोगाई : मुलींच्या सर्वागिंण विकासासाठी व व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी अशी शिबीरे आवश्यक असतात योगेश्वरी शिक्षण संस्थेने गेल्या 17 वर्षापूर्

मराठी पत्रकार परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्याकडून वैद्यकीय मदत कक्षाचे कौतुक..!
धनादेश न वटल्याप्रकरणी प्रकाश भिमराव पवार यास शिक्षा
बीडमध्ये मेडीकलच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

अंबाजोगाई : मुलींच्या सर्वागिंण विकासासाठी व व्यक्तिमत्वाला आकार देण्यासाठी अशी शिबीरे आवश्यक असतात योगेश्वरी शिक्षण संस्थेने गेल्या 17 वर्षापूर्वी आत्मभान शिबीर सुरू केले व ते आजही तितक्या जोमाने यशस्वीपणे सुरू आहे.
ही अत्यंत महत्वाची असून या शिबीरातून मुलींना भविष्याबद्दलची दिशा मिळेल आहात तसाच जीवनाचा स्विकार करा आपोआपच जीवन बदलेल असे मत कोल्हापुर येथील समुपदेशक ऍड.प्रा. श्रीकांत माळकर यांनी व्यक्त केले.  ते योगेश्वरी शिक्षण संस्था संचलित योगेश्वरी क्रिडा प्रबोधिनी,श्रीमती कमल खुरसाळे स्मृती न्यास,स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, श्रीमती गो.कु.यो. कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आयोजित महिला आत्मभान प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर होते.व्यासपीठावर यो.शि.संस्थेचे सचिव कमलाकर चौसाळकर, सल्लागार एन.के. गोळेगांवकर,एम.एस. लोमटे,संचालक सय्यद पाशुमियाँ,डॉ.जे.बी. मोटेगावकर, आर.व्ही.सोनवळकर, प्राचार्य डॉ.प्रशांत देशमुख,शालेय पदाधिकारी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ऍड. श्रीकांत माळकर म्हणाले की, नकारात्मकता जीवनातून काढून टाकली पाहिजे त्याच बरोबर परिस्थिती बद्दल तक्रार नसावी तरच पुढील प्रवास सुखकारक होईल. वरचेवर काळ बदलत असून समाज माध्यमे हे एक अविभाज्य घटक बनली आहेत. त्याच्यातील जे चांगले आहे ते घेतले पाहिजे येणार्‍या संकटांना सकारात्मकपणे सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपात चंद्रशेखर बर्दापुरकर म्हणाले की, योगेश्वरी शिक्षण संस्थेने सुरू केलेल्या महिला आत्मभान प्रशिक्षण शिबीराच्या माध्यमातून स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करण्याची संधी मुलींना प्राप्त झाली असून यातूनच जीवनात जडणघडण होते.परीक्षेतील गुण म्हणजे गुणवत्ता नव्हे तर जीवनातील स्वतःची उत्तम जडण घडण,चांगली वर्तणुक याची सांगड घालून आपण जगत असलेले व्यक्तिमत्व म्हणजे जीवन व प्रगती असल्याचे त्यांनी सांगितले.प्रारंभी प्रास्तविकातून मुख्याध्यापिका एम. एस.कुलकर्णी यांनी शिबीरा बाबतचा उद्देश सांगितला.पोलीस भरतीत निवड झाल्याबद्दल यो.शि.संस्थेच्या माजी विद्यार्थिनी सोनाली खाडप, पुजा गडदे , दिव्या कदम यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या उपस्थितीत महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पाजंली अर्पण करण्यात आली. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक,योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या विविध विभागातील प्राध्यापक,शिक्षक, कर्मचारी,पालक उपस्थित होते.

COMMENTS