Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुस्लिम समाजाच्या विकास योजनांवर सुनेत्राताई पवार यांची कटिबद्धतामुलींच्या वसतिगृह व ‘मार्टी’साठी ठोस पावले – शेख निजाम

बीड : विकास विभागांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेली बैठक सकारात्मक आणि परिणामकारक चर्च

पार्थ समर कॅम्पमुळे बालकांना नवी दिशा : डॉ. संदीप पवार
महिलांनी प्रशिक्षणातून व्यवसाय उभा करावा; शालिनी विखे पाटील ; जनसेवा फाउंडेशन अंतर्गत महिलांना प्रशिक्षण
तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनमध्ये ‘नारी शक्ती कौशल्य अभियान’ संपन्न;महिलांच्या घटनात्मक अधिकार व करिअर संधींबाबत विद्यार्थिनींमध्ये जागरूकता


बीड : विकास विभागांतर्गत राबविण्यात येणार्‍या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेली बैठक सकारात्मक आणि परिणामकारक चर्चेसह यशस्वीरीत्या पार पडली.
या बैठकीत शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यावर विशेष भर देण्यात आला. राज्य सरकार या दिशेने पूर्णतः कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. चेंबूर येथील अणुशक्तीनगर परिसर तसेच बीड येथे अल्पसंख्याक मुलींसाठी प्रस्तावित वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून कामाला गती देण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आले. या प्रकल्पासाठी मा.आ. विजयसिंह पंडित, नगराध्यक्ष प्रेमलताताई पारवे, उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, शेख मुजीबभाई, फारुख पटेल आणि भागवत तावरे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याची माहिती देण्यात आली. अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक उन्नतीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर राज्य सरकारचा भर असून, विशेषतः मुलींच्या उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी दर्जेदार सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. बैठकीत ‘मार्टी’ संस्थेशी संबंधित मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा झाली. संस्थेसाठी स्वतंत्र लेखा उघडणे, मंजूर पदांची तत्काळ भरती करणे तसेच तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर कार्यालय सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. अल्पसंख्याक तरुणांना आधुनिक शिक्षणाशी जोडण्यासाठी कौशल्य विकास, तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. अल्पसंख्याक पायाभूत सुविधा व विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी निवेदन मा. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी सादर केले.

COMMENTS