अकोले : अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला १३११ रुपये प्रति क्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यासोबतच सोयाबीन, गहू, मका व हरभरा या पिकांनाही समाधानकारक दर मिळाल्याचे चित्र आहे. बाजार समितीत कांद्याची एकूण २४०१ गोण्यांची आवक झाली. गोळा कांद्याला ११०१ ते १३११ रुपये दर मिळाला, तर नंबर १ कांद्याला ८०१ ते १००१ रुपये, नंबर २ ला ५०१ ते ७५१ रुपये, नंबर ३ ला ३०१ ते ५०१ रुपये दर मिळाला. गोल्टी कांद्याला ४०१ ते ७०१ रुपये, तर खाद कांद्याला १०० ते ३०१ रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीने दिली. इतर पिकांमध्ये सोयाबीनला ५५०० ते ५९०० रुपये प्रति क्विंटल, मक्याला १५०० ते १८०० रुपये, गव्हाला २००० ते २३०० रुपये, तर हरभऱ्याला ४५०० ते ५१०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला. अकोले बाजार समितीमध्ये दर रविवार, मंगळवार व गुरुवार या दिवशी गोणी लिलावाद्वारे कांद्याची विक्री केली जाते. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मुख्य बाजार आवारात विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, उपसभापती रोहिदास भोर व प्र. सचिव राजेंद्र जगताप यांनी केले आहे.

अकोले : अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला १३११ रुपये प्रति क्विंटल असा सर्वाधिक बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यासोबतच सोयाबीन, गहू, मका व हरभरा या पिकांनाही समाधानकारक दर मिळाल्याचे चित्र आहे.
बाजार समितीत कांद्याची एकूण २४०१ गोण्यांची आवक झाली. गोळा कांद्याला ११०१ ते १३११ रुपये दर मिळाला, तर नंबर १ कांद्याला ८०१ ते १००१ रुपये, नंबर २ ला ५०१ ते ७५१ रुपये, नंबर ३ ला ३०१ ते ५०१ रुपये दर मिळाला. गोल्टी कांद्याला ४०१ ते ७०१ रुपये, तर खाद कांद्याला १०० ते ३०१ रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीने दिली.
इतर पिकांमध्ये सोयाबीनला ५५०० ते ५९०० रुपये प्रति क्विंटल, मक्याला १५०० ते १८०० रुपये, गव्हाला २००० ते २३०० रुपये, तर हरभऱ्याला ४५०० ते ५१०० रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला.
अकोले बाजार समितीमध्ये दर रविवार, मंगळवार व गुरुवार या दिवशी गोणी लिलावाद्वारे कांद्याची विक्री केली जाते. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मुख्य बाजार आवारात विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती भानुदास तिकांडे, उपसभापती रोहिदास भोर व प्र. सचिव राजेंद्र जगताप यांनी केले आहे.

COMMENTS