कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघात सुरू असलेल्या वीजटंचाईविरोधात आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. “वीज द्या, नाहीतर आंदोलन तीव्र करू” अशी आक्रमक भूमिका घेतली. ४० ते ४२ अंशांपर्यंत तापमान वाढलेले असताना विजेचा अनियमित व खंडित पुरवठा सुरूच असल्याने नागरिक अक्षरशः होरपळत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांना उकाड्याचा मोठा फटका बसत असून वाडी-वस्त्यांवर सिंगल फेज वीजही उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शेतीसाठी आवश्यक थ्री फेज वीजपुरवठा अखंडित न मिळाल्याने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या सर्व मुद्द्यांवर नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त केला. “महावितरणचे अधिकारी वेळेवर प्रतिसाद देत नाहीत, तक्रारींवर ठोस कार्यवाही होत नाही, फक्त आश्वासने दिली जातात,” अशी तीव्र नाराजी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. आ. रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले व “नागरिकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल,” आणि कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोंडून बाहेरून टाळे ठोकण्यात येईल असा इशाराही दिला. आंदोलनात रघु आबा काळदाते, नामदेव राऊत, विश्वनाथ राऊत, विशाल म्हेत्रे, गुलाब तनपुरे, मंगेश आजबे, अमृत लिंगडे, प्रशांत राळेभात, राम कानगुडे, अनिल पांडुळे, डॉक्टर चंद्रकांत कोरडे,दीपक शिंदे, विजय मोंढळे, सुधीर जगताप,ज्ञानदेव लष्कर यांच्यासह कर्जत-जामखेडमधील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या दडपणामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. सायंकाळी ६ ते ९ दरम्यान होणारी वीजकपात थांबवण्यात येईल तसेच ज्या ठिकाणी अडचणी आहेत तिथे तात्काळ उपाययोजना करण्यात येतील, असे अधीक्षक अभियंत्यांनी स्पष्ट केले.

कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघात सुरू असलेल्या वीजटंचाईविरोधात आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. “वीज द्या, नाहीतर आंदोलन तीव्र करू” अशी आक्रमक भूमिका घेतली.
४० ते ४२ अंशांपर्यंत तापमान वाढलेले असताना विजेचा अनियमित व खंडित पुरवठा सुरूच असल्याने नागरिक अक्षरशः होरपळत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांना उकाड्याचा मोठा फटका बसत असून वाडी-वस्त्यांवर सिंगल फेज वीजही उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. शेतीसाठी आवश्यक थ्री फेज वीजपुरवठा अखंडित न मिळाल्याने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान होत आहे.
या सर्व मुद्द्यांवर नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त केला. “महावितरणचे अधिकारी वेळेवर प्रतिसाद देत नाहीत, तक्रारींवर ठोस कार्यवाही होत नाही, फक्त आश्वासने दिली जातात,” अशी तीव्र नाराजी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
आ. रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले व “नागरिकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल,” आणि कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोंडून बाहेरून टाळे ठोकण्यात येईल असा इशाराही दिला.
आंदोलनात रघु आबा काळदाते, नामदेव राऊत, विश्वनाथ राऊत, विशाल म्हेत्रे, गुलाब तनपुरे, मंगेश आजबे, अमृत लिंगडे, प्रशांत राळेभात, राम कानगुडे, अनिल पांडुळे, डॉक्टर चंद्रकांत कोरडे,दीपक शिंदे, विजय मोंढळे, सुधीर जगताप,ज्ञानदेव लष्कर यांच्यासह कर्जत-जामखेडमधील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनाच्या दडपणामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. सायंकाळी ६ ते ९ दरम्यान होणारी वीजकपात थांबवण्यात येईल तसेच ज्या ठिकाणी अडचणी आहेत तिथे तात्काळ उपाययोजना करण्यात येतील, असे अधीक्षक अभियंत्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS