Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या कार्याची घेतली दखल

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्‍वभूमीवर यशवंतराव चव्हाण (मुंबई-पुणे) द्रुतगती महामार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’ (मिसिंग लिंक) जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्

शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांची डॉ. अशोक सोनवणे यांची भेट
‘गतिमान महाराष्ट्राचा शिल्पकार’ पुस्तकाचीजिल्हा माहिती अधिकारी काझी यांना भेट
भारताचा असामान्य अभियंता ‘भारतरत्न’ ठरावा !

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्‍वभूमीवर यशवंतराव चव्हाण (मुंबई-पुणे) द्रुतगती महामार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’ (मिसिंग लिंक) जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे. आधुनिक अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना ठरलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ करणारा ठरणार असून, महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला नवी गती देणारा ठरतो.
या ऐतिहासिक क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार केला. यावेळी मान्यवरांनी एमएसआरडीसीच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करत, अत्यंत आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीत उत्कृष्ट नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, काटेकोर अंमलबजावणी आणि वेळेत पूर्णत्वास नेलेले कार्य यांचे विशेष कौतुक केले. या प्रकल्पामागील अभियंते, तांत्रिक तज्ज्ञ, कामगार आणि प्रशासकीय पथक यांच्या समन्वयित प्रयत्नांमुळेच हा जागतिक दर्जाचा प्रकल्प साकार झाला, असेही त्यांनी नमूद केले.

COMMENTS